
नाशिक । प्रतिनिधी Nashik
सप्तशृंंगी गडावर ( Saptshrungi Gad )भगवतीचे मंदिर ( Saptshrungi Devi Mandir / Bhagvati Devi Mandir ) येत्या 21जुलैपासून दीड महिना बंद ठेवण्याच्या विश्वस्त मंडळाच्या निर्णयाला भाविकांनी हरकत घेतल्यानंतर आता पुन्हा हा निर्णय लादल्यास फार मोठा रोष व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा आज आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडाचे प्रमुख महंत ऋषीकेश नंदीगिरी (Mahant Rishikesh Nandigiri)यांंनी पत्रकार परिषदेत दिला.
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत मंदिर बंद ठेवून देवस्थान नक्की काय करणार? याचा खुलासा करण्याची मागणी केली होती. आज त्यांनीच नंदीगिरी महाराजांच्या तोंडून हा इशारा दिला आहे. .
संपूर्ण भारतामध्ये आदिशक्तीचे 51 शक्तीपीठे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ मानले जातात.त्यापैकी सप्तश्रृंगी निवासिनी देवी या शक्तीपीठाला महत्त्व आहे.संपूर्ण भारतामधून देवीचे भक्त सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनाला येत असतात. देवस्थानने 45 दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामध्ये कुठलीही स्पष्टता देवस्थान ट्रस्टने केलेली नाही.
फक्त एक पत्रक काढून मंदिर बंद ठेवणेविषयी माहिती दिली. त्यामुळे देवींच्या भक्तांत संभ्रमावस्था आहे. मंदिर बंद ठेवण्याच्या काळात देवस्थान भगवतीच्या मुळ मूर्तीत काही बदल करणार आहेत का? वज्रलेप करण्याचा काही निर्णय घेण्यात आलेला आहे का? असा सवाल करत जिल्हाधिकार्यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
देवीच्या मूर्तीबाबत, तिच्या स्वरूपाबाबत काही बदल करणार आहात का? हे भाविकांसमोर, जनतेसमोर यायला हवे. देवस्थानने देवीच्या मूर्तीबाबत संवर्धन करणार आहे असे म्हटले आहे. याबाबत संस्थानने पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन यांची रितसर परवानगी घेतली आहे का? तसेच मूर्तीला हात लावण्याबाबत पुरातत्व विभागाच्या तज्ञ समितीने वणी देवस्थानला भेट दिली आहे का? सप्तशृंगी देवस्थानने आपल्या पत्रामध्ये खासगी संस्थांना पाचारण करणार असल्याचे म्हटले आहे.देवीच्या मुळ स्वरूपाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. धर्मसभा व पुरातत्त्व विभाग यांच्या संमतीशिवाय काहीही करु नये,अन्यथा गडाच्या पहिल्या पायरीवर आत्मदहन करेल असा इशारा नंदीगिरी यांनी दिला आहे.
आतील काम इनकॅमेरा व्हावे
मुळात खासगी संस्थांना अशा देवीच्या स्वयंभू मूर्तीला हात लावण्याचा किंवा तिच्यामध्ये काही बदल करण्याचा, वज्रलेप लावण्याचा कोणताही अधिकार नाही. संस्थान आपल्या मनमानी पद्धतीने 45 दिवस मंदिर बंद ठेवून आतमध्ये काय करणार हे कॅमेर्यासमोर व्हावे,अशी मागणी करण्यात आली आहे.