भावली धरणातून शहापूरला पाणी देण्यास विरोधच
नाशिक

भावली धरणातून शहापूरला पाणी देण्यास विरोधच

मुंबईत झालेल्या बैठकीत माजी जि. प. सदस्य माळी यांची भूमिका

Abhay Puntambekar

घोटी । जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्यात नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या भावली धरणातून दरवर्षी अनेक कारणातून मोठ्या प्रमाणात उपसा करून पाण्याची पळवापळवी होते. पाण्याचे आरक्षण व आकडेवारीची दिशाभूल करून भावली धरणातून शहापुरला पाणी देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे . मात्र भावलीतून शहापुर तालुक्याला पाणी देण्याच्या प्रस्तावाला आमचा विरोधच आहे अशी भूमिका माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्धन माळी यांनी नमूद केली.

इगतपुरी तालुक्यातील धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांसाठी दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दालनात बैठका झाल्या. या बैठकात विविध विषयांवर चर्चा झाली यावे आमदार हिरामण खोसकर यांच्यासह उपस्थितांनी भावली धरणातून शहापुरला तालुक्याला पाणी देण्यास विरोध केला. यापूर्वीही अनेकवेळा शासन प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा करून हा विरोध कायम ठेवला होता.

प्रशासनाकडून भावली धरणातील पाण्याची आकडेवारी व पाण्याचे असलेले आरक्षण यांच्यात विसंगती दर्शवून स्थानिकांची दिशाभूल केली जाते.त्यातूनच पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो.

Deshdoot
www.deshdoot.com