महामार्गासाठी जमीन मोजणीला विरोध

दरांबाबत शेतकर्‍यांच्या हरकती
महामार्गासाठी जमीन मोजणीला विरोध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारचा रस्ते जोडणीमधील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे सुरत -चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्ग (Surat-Chennai Green Field Highway )होय.यासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जागा हस्तांतरित (Land acquisition ) होणार आहेत त्याच्या मोजणीला आता शेतकर्‍यांकडून विरोध सुरु झाला आहे. सिन्नर आणि निफाड या तालुक्यातील शेतकर्‍यांनी देण्यात येणार्‍या दरांबाबत हरकती घेतल्याने आता त्याबाबत त्यांची समजूत घालण्याची अतिरिक्त जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेवर आली आहे. परिणामी, प्रकल्प मुदतीत होण्यास अडचण निर्माण होत आहे.

दरम्यान, या महामार्गासाठी 6 तालुक्यांतील 996 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. ही जमिन संपादित करण्यासाठी आता प्रशासनाची चांगलीच कसोटी लागली आहे. जिल्ह्यात सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड आणि सिन्नर या सहा तालुक्यांमधील एकूण 69 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. नाशिक तालुक्यातील ओढा, लाखलगाव, विंचूरगवळी आणि आडगाव या चार गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यांत आली असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ती पूर्ण होईल.

ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. पण आता शेतकर्‍यांचा विरोध पाहाता यास विलंबाची शक्यता आहे. समृध्दीसह नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी जमिनी संपादीत न करता वाटाघाटीने थेट खरेदी केल्या जात आहेत. सुरत- चेन्नई या महामार्गासाठी मात्र कमी भाव दिला जात असून पैशातही कपात केली जाणार आहे. हे अत्यंत अन्यायकारी असल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. बाजारभावाच्या पाचपटीने दर द्यावे, अन्यथा जमिनी दिल्या जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

Related Stories

No stories found.