समाजमंदिर भाडेवाढीला विरोध

समाजमंदिर भाडेवाढीला विरोध

शिष्टमंडळाची शरद पवार यांच्याकडे मागणी

दे.कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

महापालिकेने NMC विविध सेवाभावी संस्थांना समाजपयोगी कामासाठी शहरातील समाजमंदिरेCommunity Hall , जागा माफक दराने भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. रेडीरेकनर दरानुसार या समाजमंदिरांचे भाडे वाढवण्याचा rent hike तयारीत प्रशासन आहे. ते होऊ नये यासाठी खासदार हेमंत गोडसे MP Hemant Godse यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खा. शरद पवार NCP President, MP Sharad Pawarयांची भेट घेतली. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री व राज्याचे सेक्रेटरी यांच्या समवेत विशेष बैठक घेऊ, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

शहरातील अनेक भूखंड महपालिकेने समाज उपयोगी कार्य करणार्‍या सेवाभावी संस्थांना माफक दराने भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. नगरसेवक , आमदार , खासदार आदी लोकप्रतिनिधींच्या निधीतून भूखंडावर संस्थांनी समाज मंदिरे व्यायाम शाळा , अभ्यासिका आदी सुरु करण्यात आलेल्या असून वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत समाज मंदिरांचा उपयोग समाजउपयोगी उपक्रमांसाठी केला जातो.

महापालिकेकडून मोफत दरात भाडेतत्त्वावर भूखंड मिळत असल्याने विविध समाजसेवी संस्था देखील सामाजिक काम करीत आहेत, परंतु आता रेडिनेकनर दरानुसार भाडेवाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या विचाराधीन आहे. हे न परवडणारे असल्याने सेवाभावी संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातूनच आज खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

समाजमंदिरांमधून चांगल्या प्रकारे समाज कार्य होत आहे. महापालिका प्रशासनाने रेडीरेकनरच्या दरानुसार भाड्यत वाढ करण्याचे निश्चित केल्यास समाजसेवी संस्थांना ही समाजमंदिर बंद केल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे हजारो तरुण तसेच वृद्धांची मोठी कुचंबना होणार आहे. या प्रश्नाची व्याप्ती राज्यभर आहे. याचा सारासार विचार करत कायद्यात बदल करून रेडीरेकनरनुसार होणारी भाडे दरवाढ थांबवावी, अशी मागणी शिष्टमंडळातील पदाधिकार्‍यांनी पवार यांच्याकडे केली.

हा विषय मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याचे सेक्रेटरी सिताराम कुंटे यांच्याकडे विशेष बैठक आयोजित करणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. या शिष्टमंडळात माजी उपमहापौर मनीष बस्ते, नगरसेवक तानाजी जायभावे , शिवाजी गांगुर्डे , राजीव ठाकरे , रंजन ठाकरे , घोरपडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com