अन्नधान्यावरील जीएसटीला विरोध

अन्नधान्यावरील जीएसटीला विरोध

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशात जीएसटी ( GST ) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा केंद्र सरकारने खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी (GST on food items)आकारण्यात येणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु आता अन्नधान्य व खाद्य वस्तूंवर नव्याने पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय व्यावसायिकांसाठी जाचक असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने ( Maharashtra Chamber of Commerce)जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

47 व्या जीएसटी कौन्सिलने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयात अन्नधान्य व नॉनब्रँडेड वस्तूंवरही पाच टक्के जीएसटी आकारणी प्रस्तावित केली आहे. अन्नधान्य व खाद्यपदार्थांतील नॉनब्रँडेड वस्तूंवरही जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा मोठा परिणाम शेतकरी आणि सर्वसामान्यांवर होणार आहे. अगोदरच पारंपरिक व्यापारावर इ-कॉमर्स व ऑनलाईनमुळे मोठा परिणाम झाला आहे. त्यात भर म्हणून जीएसटी लागू केल्यास त्याचा विपरीत परिणाम या पारंपरिक व्यापारावर, पर्यायाने त्यावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांवर होणार आहे. भविष्यात बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळण्याची शक्यता आहे, असे चेंबरच्या निवेदनात म्हटले आहे.

खाद्यपदार्थांवरील अन्नधान्य व खाद्यपदार्थांमधील नॉनब्रँडेड वस्तूंवरही जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात येऊ नये, बाजार समिती कर आकारते. त्यामुळे ‘एक देश एक कर’ संकल्पनेनुसार अन्नधान्यावर जीएसटी नसावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, उत्तर महाराष्ट्र शाखा अध्यक्ष कांतीलाल चोपडा, संजय सोनवणे, कार्यकारिणी सदस्य राजाराम सांगळे, दत्ता भालेराव, कैलास पाटील, मिलिंद राजपूत, ललित नाहार, नाशिक धान्य घाऊक किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, नाशिक किरकोळ किराणा संघटनेचे माजी अध्यक्ष शेखर दशपुते, सहसचिव प्रभाकर गाडे, कार्याध्यक्ष संतोष राय आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

16 जुलैस व्यापार बंद

अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून पाच टक्के जीएसटीविरोधात शनिवारी (दि.16) व्यापार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयावर आज पद्मश्री बाबूभाई राठी सभागृहात नाशिकमधील सर्व घाऊक व किरकोळ व्यापारी संघटनांची बैठक झाली. चेंबरचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर देशमुख अध्यक्षस्थानी होते. त्या बैठकीत 16 जुलैस व्यापार बंदचा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com