फुकटात पायलट होण्याची सुवर्णसंधी; माहितीसाठी 'वाचा' बातमी

फुकटात पायलट होण्याची सुवर्णसंधी; माहितीसाठी 'वाचा' बातमी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाज्योतीने ओबीसी (OBC), विजेएनटी (VJNT), एसबीसी (SBC) विद्यार्थ्यांना मोफत कमर्शियल पायलट ट्रेनिंग (Free Commercial Pilot Training) देण्याचा निर्णय घेतला आहे...

प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळणार आहेत. सामान्य ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे उंच आकाशात विमान उडविण्याचे स्वप्न महाज्योतीच्या (Mahajyoti) योजनेतून पूर्ण होणार आहे.

महाज्योतीने यासाठी महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) नागपूर फ्लाईंग क्लब (Nagpur Flying Club) यांच्याशी करार केला आहे. त्यानूसार प्रतिविद्यार्थी सत्तावीस लाख रूपये फी आकारली जाईल. परंतु ही सर्व फी महाज्योतीच्या वतीने नागपूर फ्लाईंग क्लबकडे भरली जाणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नागपूर येथे मोफत कमर्शियल पायलट ट्रेनिंग मिळेल. प्रशिक्षणाचा कालावधी हा १८ महिन्यांचा असेल. गरजू विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याची बाब सुध्दा संचालक मंडळासमोर आहे. यावर्षी केवळ २० जागाच नागपूर फ्लाईंग क्लबकडे प्रशिक्षणासाठी उपलब्ध असल्यामुळे त्यासाठी महाज्योतीने ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांचे अर्ज मागितले आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ज्यांनी फिजिक्स (physics), केमिस्ट्री (physics) व गणित (Maths) विषय घेवून,१२ वी (HSC) परीक्षा पास झालेले शहरी भागातील ७० टक्के व ग्रामीण भागातील ६५ टक्के गूण मिळवले आहेत. ते सर्व विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जासाठी १८ ते २८ हे वयोमर्यादेचे बंधन आहे. विद्यार्थ्यांना नॉनक्रिमिलेयर असणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.

पुढील काळात महाज्योती नॅशनल डिफेन्स अकादमी सी. ए., ज्युडीसरी अशा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्रे सुरू करीत आहेत. यासाठी महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाज्योतीला १५० कोटी रूपये मंजुर केले आहेत. ६५ कोटी रूपये महाज्योतीच्या खात्यात जमादेखील झाले आहेत.

विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर जावून मोफत कमर्शियल पायलट ट्रेनिंगचा लाभ घ्यावा. दि. १२ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण आवश्यक कागदपत्रे अपलोड करून, ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे (Divakar Game) यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com