उघड्या गटारींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उघड्या गटारींमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पुनदखोरे । वार्ताहर Punadkhore - Kalwan

कळवण (Kalwan) नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्र. 6 (रामनगर) मध्ये उघड्या गटारींमुळे नागरीकांचे आरोग्य (Health) धोक्यात येत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने उघड्या गटारींवर ढापे टाकुन आरोग्यविषयी उपाययोजना राबविण्याची मागणी कळवण तालुका (Kalwan Taluka) भारतीय जनता पार्टीचे (Bhartiya Janata Party) चिटणीस रोहिदास अहिरे (Rohidas Ahire) यांनी निवेदनाव्दारे केली. या आशयाचे निवेदन नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी बी. ए. कापसे यांना देण्यात आले आहे.

कळवण नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्र. 6 मध्ये 2 वर्षापुर्वी रस्ते (Road) व गटारींचे (Gutters) कामे झाली होती. कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची झाल्याने गटारी चक्क उलट्या दिशेने वाहत आहे. सांडपाण्याने तुडूंब भरलेल्या गटारींमुळे संपुर्ण परीसरात दुर्गधी पसरली आहे. याबाबत वेळोवेळी नगरपंचायतीचे अधिकारी तसेच ठेकेदार पाटील यांना सांगीतले असता त्यांनी वेळ मारत कोणताच प्रतिसाद दिलेला नाही.

सफाई कामगार (Sweepers) दोन ते तीन दिवसांतून येऊन घाण कचरा काढून घेतात. पंरतू निकृष्ठपणे बांधलेल्या गटारी तुडूंब भरून नागरीकांच्या घरातील स्नानगृहामधुन दुर्गधीयुक्त पाणी येत असल्याने घरात बसणे मुश्किल होत आहे. या संदर्भात नगरपंचायत प्रशासन व ठेकेदाराला सांगितले. पंरतू त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने परीसरात साथीच्या आजारांने डोके वर काढले आहे. तरी तात्काळ उघड्या गटारींवर ढापे टाकुन दुषित पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे अहिरे यांनी केली आहे.

गेल्या पाच वर्षापासुन प्रभाग क्र. 6 चे नगरसेवक बाळू जाधव यांनी प्रभागात साधा फेरफटका सुद्धा मारलेला नाही. ज्यावेळी गटारींचे कामे सुरु होती. त्यावेळी संबधित नगरसेवकाने उभे राहून ठेकेदारांकडून योग्य कामे करून घेणे बंधनकारक होते. पंरतू संबधिताने प्रभागाकडे दुर्लक्ष केल्याणे प्रभागास कोणी वाली आहे का ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे. प्रशासनाने उघड्या गटारींचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.

- रोहिदास अहिरे, तालुका चिटणीस भाजप

Related Stories

No stories found.