शहरातील उघडे वीज रोहित्र बनले 'डेंजर झोन'

महावितरणचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
शहरातील उघडे वीज रोहित्र बनले 'डेंजर झोन'

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पावसाळ्यात विद्युत वाहिन्यांचा (Power Supply Cable) कोणताही प्रश्‍न उद्भवू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्यांवर येणार्‍या झाडांच्या फांद्या काढण्यात आल्यात. दरवर्षी खर्च करुन ही कामे केली जातात. मात्र शहराच्या विविध भागातील वीज रोहित्र (डीपी) उघडे असून ते धोकादायक बनले आहेत. महावितरणचे (Mahavitaran) याकडे दूर्लक्ष झाल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे...

या वीज रोहित्रातून (Distribution Box) चोवीस तास विद्युत पुरवठा (Power Supply) सुरु असल्याने एखाद्या वेळेस विद्युत रोहित्राशी संपर्क येऊ शकतो, आणि यातून एखादी दुर्घटना उद्भवू शकते. या धोकेदायक रोहित्रांना कोणतेही आवरण लावलेले नाही. विद्युत रोहित्र मोकळे का? असा सवाल नागरिक करीत आहेत.

अनेक रोहित्रांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. प्रत्येक वर्षी उघड्या रोहित्रांचा प्रश्‍न उद्भवत असतो. जेलरोड परिसरातील (Jailroad) पंचक शिवरस्त्यावर अगदी कमी उंचीचे विद्युत रोहित्र असून त्याला कोणतेही आवरण नाहीये. केवळ एका पुठ्याच्या सहाय्याने हे रोहित्र झाकण्यात आले आहे. याठिकाणी कधीही दुर्घटना घडू शकते.

याशिवाय गंगाघाट (Gangaghat), रविवार कारंजा (Ravivar Karanja), गणेशवाडी (Ganeshwadi), मेहेर सिग्नल (Meher Signal), गाडगे महाराज पूल (Gadge Maharaj Pool), हिरावाडी (Hirawadi), शिवमनगर (Shivamnagar) या भागातील वीज रोहित्र पूर्णपणे उघडी आहेत. अनेक रोहित्र जुनी झाल्याने त्या ठिकाणी नवीन रोहित्र लावण्याची गरज आहे.

वीज बिल थकले तर विद्युतपुरवठा खंडीत केला जातो, मात्र नागरिकांचा जीव धोक्यात आणणारे विद्युत रोहित्रांचे काय? असा सवाल नाशिककर करीत आहे

आमच्या परिसरात अगदी लहान मुलांचा संपर्क येईल, असे विद्युत रोहित्र आहे. महावितरणला याची कल्पना देऊनदेखील त्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे. एखादी दुर्घटना घडली तर, यास महावितरणचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. त्यामुळे तत्काळ हे रोहित्र बंदिस्थ करावे.

सागर भोजने, सामाजिक कार्यकर्ते, जेलरोड.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com