मांसजन्य कचर्याची विक्रेत्यांकडून उघड्यावर विल्हेवाट

मांसजन्य कचर्याची विक्रेत्यांकडून उघड्यावर विल्हेवाट

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

शहरातील चिकन (Chicken) व्यावसायिकांकडून कोंबड्या कापल्यानंतर निघणारा कचरा (garbage) हा सर्रासपणे नागरी वस्तीतील मोकळ्या जागेंवर फेकला जात असल्याने परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

शहरात वावी वेस परिसर, नाशिकवेस, पडकी वेस, खाटीक गल्ली, गंगावेस, सरदवाडी रोड परिसरात अनेक चिकनची दुकाने (Chicken shops) आहेत. एका दुकानात दररोज किमान 15 ते 20 कोंबड्या कापल्या जातात. शहरात जवळपास दरराजे शेकडो कोंबड्या कापल्या जातात. मात्र, हे व्यावयायिक कोंबड्या कापल्यानंतर निघणारी घाण सरळ नागरी वस्तीतील मोकळ्या जागेंवर उघड्यावर टाकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असते. कोंबड्यांची निघणारी घाण कानडी मळ्याच्यापूढे बारागाव पिंपरी रस्त्याच्या (Baragaon Pimpri Road) कडेला मोकळ्या परिसरात फेकून देण्याचे प्रमाण वाढले आहे.

तसेच सरदवाडी रोड परिसातील अनेक व्यावसायिक हा कचरा (garbage) बायबास परिसरात सर्रास उघड्यांवर टाकून देतात. बारागाव पिंप्री रोडसह सरदवाडी रोडवर सकाळ-संध्याकाळ पायी फिरायला जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शहरातील वर्दळीतून बाहेर पडत अनेक जण मोकळा श्वास घेण्यासाठी बाहेर पडत असतात. मात्र, फिरायला जाणार्‍या ठिकाणी सडलेल्या घाणीमुळे त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

त्यातून आरोग्य विषयक समस्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शहरातील चिकन व्यावसायिकांनी आपली जबाबदारी लक्षात घेता हा कचरा उघड्यावर न टाकता नगर परिषदेच्या (nagar parishad) घंटागाडीतच (ghantagadi) टाकावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नगर परिषदेने सर्व चिकन व्यवसायिकांना शिस्त लावावी व त्यांना कचरा उघड्यावर टाकू नये यासांठी तंबी द्यावी, हे व्यावसायीक ऐकत नसल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

मोकाट कुत्र्यांचा त्रास

चिकन व्यावसायिक आपल्या दुकानातून निघणारी घाण नागरी वस्तीजवळील मोकळ्या जागेत टाकत असल्याने परिसरातील मोकाट कुत्रे या घाणीवर ताव मारताना दिसतात. मात्र, ही कुत्री 8-10 जणांच्या टोळक्याने अशा ठिकाणी जमा होत असल्याने त्यांच्या भांडणे होऊन ही कुत्रे कोंबड्यांची घाण तोंडात घेऊन येत नागरिकांच्या घराजवळ तर काहींच्या अंगणातच आणून टाकत असल्याने नागरिकांचीही डोकेदुखी वाढत आहे.

नगरपरिषदेने कारवाई करावी

शहरातील चिकन व्यावसायिकांच्या दुकानातून निघणारा कचरा टाकण्यासाठी शहरात कुठेतरी एक जागा निश्चित करुन त्यांना त्याच ठिकाणी हा कचरा, घाण टाकण्याचे आवाहन करण्याचे मागणी नागरिक करत आहेत. ठिकठिकाणी हा कचरा टाकण्यापेक्षा एकाच जागेवर हा कचरा पडल्यास नगरपरिषदेच्या सफाई कामागारांनाही हा कचरा उचलून नेणे सोपे होऊ शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com