तीनच बस धावल्या; एसटी महामंडळ उत्पन्नापासून काेसाे दूर

तीनच बस धावल्या; एसटी महामंडळ उत्पन्नापासून काेसाे दूर
एसटी महामंडळ

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२२) रात्री आठ वाजेपासून राज्यात लॉकडाउनअंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशी वाहतुकीवर हाेण्यास सुरवात झाली आहे. (दि.२३) दिवसभरात नाशिक डेपो एकमधून अवघ्या तीन बसेस धावल्या. इतर डेपोच्याही ९५ टक्क्यांपेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या...

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत एसटीच्या बसगाड्यामधून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवासाची मुभा देण्यात आला आहे. त्यातही आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

संचारबंदी लागू असल्याने प्रवाशीही घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एसटीच्या एकूण उत्पन्नावर परिणाम झाला असून बसच डेपाेत स्थिरावल्याने उत्पन्न येणे बंद झाले आहे.

करोना संकटापूर्वी नाशिक डेपो एकमधून दररोज सुमारे दीडशे बसेसच्या माध्यमातून साडेतीनशे फेऱ्या पूर्ण केल्या जात होत्या. आज अवघ्या तीन बसेस ठक्कर बाजार बसस्थानकातून धुळेसाठी सोडण्यात आल्या होत्या. साडेतीनशेपेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की एसटी प्रशासनावर ओढविली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com