नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

केंद्र सरकारने सुरू केलेल्या एक देश एक रेशनकार्ड योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. मागील वर्षभरात फक्त तिन रेशन लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

या योजनेच्या माध्यमातून कोणताही रेशनकार्डधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही राज्यातल्या रेशन दुकानावरुन धान्य घेऊ शकतो.

लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे केली जाऊ शकते. करोना संकटात देशभरात मोठ्या प्रमाणात मजुरांनी स्थलांतर केले.

त्यामुळेच केंद्र सरकारने ही योजना राबवून स्थलांतरितांना दिलासा दिला. पण या योजनेला जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. मुळचे बिहारचे पण रोजगारासाठी नाशिकला स्थलांतर झालेल्या तीन बिहारी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला.

एक देश, एक रेशन कार्ड या योजनेचा तीन जणांनी लाभ घेतला. परप्रांतीय मजुरांनी इथे रेशनचा लाभ घेतला तर गावी असलेल्या त्यांच्या परिवाराला त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसते.
डॉ. अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी