नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याणसह विधी, वैद्यकीय सहाय्य-आरोग्य व शहर सुधारणा अशा चारही विषय समितीत सत्ताधार्याचे बहुमत असल्याने चारही सभापती भाजपचेच होणार आहे. येत्या 10 डिसेंबर सभापती पदाची निवडणुक ही केवळ औपचारिकता म्हंणुन होणार आहे. आगामी मनपा निवडणुक लक्षात घेऊन सभापती पद देऊन नाराजी काढण्याची तयारी भाजपकडुन करण्यात येणार आहे.

करोनामुळे गेल्या सात महिन्यापासुन प्रलंबीत राहिलेल्या महापालिकेच्या विषय समितीच्या सदस्य व सभापती निवडीला विलंब झाला आहे. मागील महिन्यात सदस्यांची निवड झाल्यानंतर आता विभागीय आयुक्तांनी विषय समिती सभापती पदाच्या निवडीसाठी 10 डिसेंबर ही तारीख जाहीर केली आहे. यात महिला व बालकल्याण, विधी, वैद्यकीय सहाय्य-आरोग्य व शहर सुधारणा या चारही विषय समिती सभापती पदाची निवडणुक होणार आहे.

महापालिकेत सत्तारूढ भाजपचे बहुमत असुन या चारही समित्यांच्या सत्ताधारी भाजपाचे सदस्य नियुक्तीतही भाजपचे वर्चस्व आहे. समित्यांच्या एकुण नऊ सदस्यात सत्ताधारी भाजपचे प्रत्येकी पाच सदस्य असल्याने त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे. तर शिवसेनेचे तीन आणि कॉँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येकी एक - एक अशांचा सदस्यांचा समावेश असल्याने विरोधकाची शक्ती क्षीण आहे. त्यामुळे या विषय समिती सभापती सत्ताधारी भाजपाचेच असणार आहे.

महापालिकेतील सत्तांधारी भाजपतील गटबाजी अलिकडच्या काळात वाढली आहे. याच कारणामुळे भाजप चार वर्षापुर्वी दाखल झालेले विद्यमान नगरसेवक आता महापालिकेत फिरकत नसुन भाजप गटनेत्यांच्या बैठकीला येणे टाळत आहे. कांही जेष्ठ नगरसेवकांना महत्वाच्या पदावर डावलण्यात आल्यानंतर त्यांच्यातील नाराजी अजुनही कायम आहे. अनेक नगरसेवकांवर पदाचा वर्षाव झाला असतांना काहींच्या पदात अपेक्षित पदे मिळालेली नाही.

या नाराजीचा फटका येणार्या निवडणुकीत बसु नये म्हणुन विषय समिती सभापती पद देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या निवडणुकीतून केला जाणार आहे. यंदाचे विषय समिती सभापती पदाला केवळ पाच सहा महिन्याचा कालावधी मिळणार असल्याने अनेकांनी सभापती पदाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली सभेत निवड

जिल्हाधिकारी मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीस प्रारंभ होणार आहे. सर्वप्रथम सकाळी 11 वाजता महिला व बालकल्याण, नंतर विधी, वैद्यकीय सहाय्य आणि शहर सुधारणा समिती अशाप्रकारे निवडणुक प्रक्रिया पार पडणार आहे.