जिल्ह्यात एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक

रेमडेसिवीरसह करोना लसींचा तुटवडा
जिल्ह्यात एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक

नाशिक । Nashik

नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. करोना नियंत्रणासाठी आता 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली असताना दुसरीकडे मात्र लसीचा मोठा तुटवडा असल्याचे वास्तव समोर येत आहे.

जिल्ह्यात केवळ एक ते दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यात 4 लाख 92 हजार 613 जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.

आज दिवसभरात 13 हजार 831 जणांना पहिला तर 4 हजार 378 जणांना दुसरा डोस असे एकुण 18 हजार 209 जणांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाचा आता चौथा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसर्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स, तिसर्‍या टप्प्यात टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त व्यक्तींना तसेच तर चौथ्या टप्प्यात आता सरसकट 45 वर्षावरील प्रत्येक नागरीकालाही लस दिली जाते आहे. तर 1 मे पासून 18 वर्षावरील प्रत्येकाला लस देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

मंगळवार ( 20 एप्रिल) पर्यंत एकुण 4 लाख 92 हजार 613 जणांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस टोचून घेतला आहेे. यामध्ये 1 लाख 14 हजार 585 आरोग्य तसेच शासकीय कर्मचारी, 60 वर्षावरील 1 लाख 94 हजार 740 तर 45 वर्षावरील 1 लाख 83 हजार 288 नागरीकांनी लस घेतली आहे. तर 65 हजार 339 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. असे जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 5 लाख 57 हजार 952 जणांचे लसीकरण पुर्ण झाले आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात 13 हजार 831 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 5 हजार 532, ग्रामिण जिल्ह्यात 8 हजार 21 असे लसीकरण झाले आहे. तर 1 हजार 378 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com