Video : नाशकात डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावरच मिळणार 'रेमडीसीवर'

जिल्हाधिकाऱ्यांकडून रियालिटी चेक
Video : नाशकात डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावरच मिळणार 'रेमडीसीवर'

नाशिक | Nashik

करोना सारख्या भयंकर आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'रेमडीसीवर' औषधा बाबत मोठ्या तक्रारी प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी रियालिटी चेक केले.

तसेच जे रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहे व ज्यांना या औषधाची खरी गरज आहे. त्यांच्या डॉक्टरांनी प्रमाणीत केल्यानंतरच आता हे औषध मिळणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

याबाबत व्हिडिओ संदेश जारी करून त्यांनी लोकांना देखील याबाबतचे आवाहन केले आहेत. मागील काही दिवसांपासून या औषधा संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, याबाबतची तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज हे रीलिटी चेक करण्यात आले.

काही ठिकाणी रुग्ण पॉझिटिव्ह आल्यावर लोक औषधे घेऊन त्याचा साठा करीत असल्याचे निदर्शनास आले आहेत. त्यामुळे ज्यांना या औषधाची खरी गरज आहे व जे विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. अशांना वेळीच हे औषध मिळत नसल्याचे दिसून आले. म्हणून जिल्हा प्रशासनाने याबाबत विशेष आदेश काढून जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे त्यांच्या डॉक्टरांनी प्रमाणित केल्यावरच हे औषध मेडिकल दुकानातून मिळणार आहेत. इतरांना हे औषध विक्री करण्यास मज्जाव होणार आहे.

यामुळे रुग्णांचे नातेवाईक यांनी समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे या औषधाचे काळे बाजार देखील रोखण्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com