निष्ठावंतांनाच उमेदवारी मिळणार: माजी आमदार वाजे

निष्ठावंतांनाच उमेदवारी मिळणार: माजी आमदार वाजे

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

शिवसेनेसाठी (shiv sena) सध्याचा काळ खूपच आव्हानात्मक असून शिवसेनेशी निष्ठावान असणार्‍या शिवसैनिकांसाठीही (shiv sainik) हा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आगामी नगरपरिषद (nagar parishad), जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समितीच्या (panchayat samiti) निवडणुकीत (election) निष्ठावान शिवसैनिकांनाच उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण आहे.

प्रत्येक प्रभाग, गट-गणातील तीन शिवसैनिकांची नावे पक्षाला कळवली जाणार असून त्यातूनच उमेदवारांची निवड पक्ष पातळीवर मुंबईतूनच करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांनी दिली. आगामी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाजे यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

नगरपरिषदेसह, जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक असणार्‍या शिवसैनिकांची मते सर्व पदाधिकार्‍यांनी जाणून घेतल्यानंतर राजाभाऊ बोलत होते. शिवसेनेशी निष्ठावान असणार्‍यांनाच या पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांच्यासह राज्याच्या सर्व नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे कोणीही टिकीट मागितले आणि लगेच त्याला टिकीट मिळाले असे यापुढे होणार नाही.

स्थानिक पातळीवरून इच्छुकांपैकी तीन इच्छुकांची नावे पक्षाला कळवली जाणार असून शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) आपल्या पातळीवर तालुक्यात सर्वेक्षण करणार आहे. त्यात शिवसेनेसोबत असलेली निष्ठा, जनमानसातील प्रतिमा या बाबींचा विचार करुन पक्ष पातळीवर उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. त्यांचे हे कामच त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेनेची (shiv sena) दमदार बांधणी झाली असून तालुक्यातील उमेदवार ठरवण्याचे अधिकार राजाभाऊंनाच द्यावेत अशी मागणी उदय सांगळे यांनी केली. आपण शेवटच्या क्षणी मॅनेज होऊ अशी आपल्याबद्दल अफवा पसरवण्यात येत आहे. मात्र, आपल्याला मॅनेज करणारा अजून जन्माला आला नसल्याचे सोमठाण्याचे सरपंच भारत कोकाटे म्हणाले.

आपण राजाभाऊंसोबत असून शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहणार आहोत. त्यामुळे अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शहर प्रमुख गौरव घरटे, नारायण वाजे, अरुण वारुंगसे, नामदेव शिंदे, प्रकाश कदम, विठ्ठल राजेभोसले, कचरु खैरनार, विनायक शेळके, आनंदा शेळके, अशोक डावरे, संग्राम कातकाडे, संजय सानप, सोमनाथ तुपे, अरुण वाघ, डॉ. रवींद्र पवार, संपत पगार,

रमेश पांगारकर, गोपाळ शेळके, दीपक बरके, विजय कटके, आर. आर. जाधव, महेंद्र चिने, सोमनाथ आव्हाड, दत्तू आव्हाड, दत्तात्रय सानप, शशिकांत येरेकर, दत्ता डोमाडे, ज्ञानेश्वर पांगारकर, लक्ष्मण बर्गे, बबन पोमनर, अण्णा देठे, शाम दळवी, कैलास वाजे, विकास वाजे, भाऊसाहेब हारळ, गणेश वेलजाळी राकेश आनप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com