बुथप्रमुखांमुळेच निवडणुका जिंकता येतात : बडगुजर

बुथप्रमुखांमुळेच निवडणुका जिंकता येतात : बडगुजर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सक्षम बूथरचना आणि बुथप्रमुखांमुळेच निवडणुका (election) जिंकण्याची जाणीव झाल्यानेच सर्व पक्ष (all party) यावर विशेष जागरुक झाल्याचे दिसून यत आह. शिवसेनेने (shiv sena) तर बूथप्रमुखांचे व्यापक जाळे निर्माण करुन या चळवळीत आघाडी घेतल्याचे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Shiv Sena mayor Sudhakar Badgujar) यांनी सांगितले.

प्रभाग 1 मधील बूथप्रमुखांचा मेळावा आभिषेक प्लाझा (म्हसरुळ) येथे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड (Former District President Datta Gaikwad) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या वेळी बडगुजर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महिला आघाडी जिल्हा संघटक मंगला भास्कर (mangala bhaskar), शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनिल जाधव, शैलेश सूर्यवंशी, समन्वयक विशाल कदम, सुनिल निरगुडे, महिला पदाधिकारी ज्योती देवरे, स्वाती पाटील, कल्पना पिगंळे, स्वाती म्हस्के, शिवसेना विभागप्रमुख संजय पिगंळे,संतोष पेलमहाले आदी होते.

बूथरचना सक्षम करण्यासोबतच प्रत्येक बुथप्रमुखाला योग्य प्रशिक्षण ही दिले आहे.त्यामुळे कोणतेही आव्हान पेलण्यासाठी तो सक्षम राहील याची हमी आपणे देतो असे बडगुजर यांनी सांगितले. बुथ प्रमुखांचे कार्य आणि अधिकारांची माहिती यावेळी दिली.आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्ता काबीज करायची असल्याने बूथप्रमुखांना डोळ्यात तेल घालून आपली भूमिका चोखपणे पार पाडावी लागेल असे प्रतिपादन माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना सांगितले.

यावेळी उपस्थित शिसैनिक,बूथप्रमुख, पदाधिकारी यांना मान्यवराच्या हास्ते शिवबंधन बाधंण्यात आले.या वेळी योगेश बेलदार,राजेंद्र वाकसरे, सुनिल देवकर, कल्पेश पीगंळे, आकुश काकड, आविनाश काकडे, दत्ता थोरात, सुरेश जाधव,सुरज दमकोंडे,अमोल राठोड, विशाल मोराडे, सुनील हाटकर,बाबा म्हस्के,दीपक अतरते आदीसंह बूथप्रमुख,शिवसैनिक उपस्थित होते...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com