नाशिक । Nashik

शहरासह जिल्ह्यात करोना संसर्गाचा स्फोट झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून खासगी अस्थापणांनामध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्केच मनुष्यबळ उपस्थित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून पुढिल आदेश येइपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हाप्रशासनाने दिला आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात करोना संकट आल्यानंतर देशात लाॅकडाऊन जारी करण्यात आला होता. खासगी आस्थापनांना वर्क फार्म होम कार्यप्रणाली राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. करोना संसर्गाने ऑक्टोबर महिन्यापर्यंत थैमान घातले होते. दिवाळीनंतर करोना उतरणिोला लागून संसर्ग कमी कमी झाला होता.

शासनानेही मिशन बिगिन अगेन अंतर्गत अर्थचक्र गतिमान करत निर्बंध शिथिल केले होते. त्यामुळे सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९८ टक्क्यांवर पोहचले होते. मृत्य दरही एक टक्क्यांवर आला होता. पण फेब्रुवारीनंतर जिल्ह्यात कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे.

वेगाने त्याचा प्रसार होत असल्याने जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहे. शनिवार, रविवारी बाजारपेठा बंद करण्यासह अनेक बाबींवर निर्बध लादले असून, आता जिल्ह्यात खासगी अस्थापणांमध्ये एकूण मनुष्यबळाच्या ५० टक्के इतकेच कर्मचारी कार्यालयांमध्ये उपस्थितीतीस परवानगी देण्यात आली आहे.

हे आदेश आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्वच खासगी अस्थापनांना बंधनकारक करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.