नाशिक । Nashik

गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेले शहरातील महाविद्यालये (दि. 15) 50 टक्के उपस्थितीने सुरू झाली. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. नवीन वर्षाच्या सुरूवातीला पाचवी ते दहावी पर्यंतच्या शाळा व अकरावी व बारावीचे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले होते.

पुणे विद्यापीठाची संलग्न असलेले जिल्ह्यातील महाविद्यालय सुरू झाली आहेत. यात वरिष्ठ महाविद्यालयासह एमबीए, एमसीए, इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेट या व्यवसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थीही पहिल्याच दिवशी महाविद्यालयात उत्साहात आल्याचे चित्र होते.

युसीजी आणि शासनाच्या नियमावलीचे पालन करत महाविद्यालय सुरू करण्यात आली आहेत. मास्कशिवाय विद्यार्थ्याना महाविद्यालयात प्रवेश दिला गेला नाही. पहिल्यदिवशी 30 ते 35 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. परिणामी येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्याचा अंदाज महाविद्यालयांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

लॉकडाऊनच्या काळानंतर महाविद्यालय सुरू झाले ही स्वागतार्ह बाब आहे. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेतले तरी ऑफलाइन शिक्षण घेणे कायम स्मरणात असते. महाविद्यालय सुरू होण्याची आम्ही आतूरतेने वाट पाहत होतो.

-स्विटी झांजे (विद्यार्थिनी)