गंगापूर धरण समुहात २६ टक्के जलसाठा

तर नाशिककरांनो होऊ शकते पाणी कपात!
गंगापूर धरण समुहात २६ टक्के जलसाठा
गंगापूर धरण

नाशिक | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) अद्यापही समाधानकारक पाउस न (Satisfactory Rain) झाल्याने गंगापूर धरण क्षेत्रातील ( Gangapur Dam) पाण्याची टक्केवारी घट्त चालली आहे.

गंगापूर धरण समुहामध्ये सोमवार (दि.5) पर्यत केवळ 26 टक्केच जलसाठा शिल्लक(Water Storage राहिला आहे. विशेष गेल्या वर्षी याचवेळी धरणसाठ्यामध्ये 30 टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होता. जिल्हयाती विविध भागात प्रशासनावर ऐन पावसाळ्यात 32 टॅकरद्वारे (Water Tanker services) गाव व वाड्यांची तहान भागवावी लागत आहे.

मान्सुन (Mansoon) वेळेआधीच दाखल होइल असा अंदाज हवामान खात्याने (Weather Department) वर्तविला होता, मात्र जून महिना उलटूनही जिल्हयात समाधानकारक पाउस पडला नाही, जुलैमध्येही पावसाने टप्पा दिल्यास पाणीबाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे बघता जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाची (Droughts Situation) तीव्रता तुलनेने कमी आहे. पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पेठ, सुरगाणा (Surgana), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), व इगतपुरी हे तालुकेही पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

तेथे पेरणी (Crop Sowing) झाली असून शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे सावट आले आहे. पावसाने ओढ दिल्याने नदी, नाले कोरडेठाक पडले असून परिणामी धरणातील जलसाठाही झपाट्याने खालावत आहे. सद्यस्थितीत जिल्हयातील धरणांमध्ये 27 टक्के जलसाठा आहे.

त्यातही पाच धरणांमध्ये अवघा दहा टक्के जलसाठा आहे, तर गिरणा खोर्यातील नागासाक्या व माणिकपुंज (Manikpunj Dam) हे दोन धरण कोरडेठाक पडले आहेत. जूनप्रमाणे जुलैमध्येही पावसाने ओढ दिल्यास धरणातील जलसाठा अधिक खालावेल. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट नाकारता येत नाही. यातुन नाशिककरांना पाणी कपातीच्या संकटाला जाण्याची भीती आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच पाणीबाणी सुरू होते. टँकरद्वारे ग्रामीण भागातील वस्त्या ववाड्यांमध्ये पाणी पुरवठ्याला सुरुवात होते.

मात्र मागील दोन वर्षापासून पर्जन्यमान चांगले होत असल्याने पाणीटंचाई जाणवली नाही; पण यंदा जून महिना गेल्यानंतर जुलै महिन्यात समाधानकारक पावसाची अपेक्षा होत आहे. याही महिन्यात पावसाने ओढ दिल्यास जिल्ह्यातील आठ ते दहा तालुक्यांत पाणीबाणीचे संकट निर्माण होऊ शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com