जिल्ह्यात अवघ्या १४.५८ टक्के पेरण्या

शेतकऱ्यांचा मका, सोयाबीन, कापसाकडे कल
जिल्ह्यात अवघ्या १४.५८ टक्के पेरण्या
संग्रहित

नाशिक । Nashik

पावसाला सुरुवात होऊन तब्बल महिन्याचा कालावधी झाला असून समाधानकारक पाऊस (Satisfactory rainfall) झालेला नाही. त्यामुळे जून महिन्यात जिल्ह्यात अवघ्या १४.५८ टक्के( ९७०३७.५४ हेक्टर ) खरिपाच्या पेरण्या(Kharip Season) झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे उद्दिष्ट ६ लाख ६५ हजार ५८२.२० हेक्टर इतके ठेवण्यात आले आहे.

खरिप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी मक्याला पसंती (Maize Crops) दिली असल्याचे चित्र आहे. ४७ हजार ३९५ हेक्टरवर मक्याची पेरणी पूर्ण झाली असून, ७०९५ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी (Soybean sowing) झाली आहे.

जिल्ह्यात सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस (Premansoon Rain) झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने तयाचा पेरण्यांना फटका बसला आहे. अद्याप पेरण्यांना म्हणावा तसा वेग आलेला नाही.

मागील सप्ताहात येवला(Yeola), निफाड(Niphad), नाशिक, इगतपुरी, सिन्नर, आदी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे या परिसरात पेरण्यांना वेग आला आहे.

येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावल्यानंतर किमान निम्मी तरी पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने (Agriculture Department) वर्तविला आहे.

शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करताना भात, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, सायाबीन, भुईमूग, आदी पिकांची थोड्याफार प्रमाणात पेरणी केली आहे. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २०३१२.२० हेक्टरवर कापूस, १०७९३.६१ हेक्टरवर तेलबिया, ७८५६ हेक्टरवर डाळवर्गीय, तर ५८०७५ हेक्टरवर तृणधान्य, तर ६५९३१ हेक्टरवर अन्नधान्य पिकांची लागवड करण्यात आली आहे.

मका, सोयाबीन, भुईमूग, मूग या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना पोळ कांदे करायचे आहे.त्यांनी सध्या मुगाची पेरणी केली असून, मूग निघाल्यानंतर खरीप कांद्यासाठी शेत मोकळे होत असल्याने शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडला आहे.

पेरणी टक्केवारी

एकूण तृणधान्य - १३.०३

डाळी -९.२८

एकूण अन्नधान्य - १२.४३

एकूण तेलबिया - ११.३९

कापूस - ५०.३७

एकूण खरीप पेरणी - १४.५८

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com