समाज कल्याण कर्मचार्‍यांना ऑनलाईन प्रशिक्षण

समाज कल्याण कर्मचार्‍यांना ऑनलाईन प्रशिक्षण

नाशिक | Nashik

यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा Yashda) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी BARTI) पुणे यांच्या वतीने राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचार्‍यांना( Social Welfare Department ) प्रशासकीय कामकाजाचे पायाभूत प्रशिक्षण ऑनलाईन (Online Training) देण्यात येणार आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे (Commissioner Dr. Prashant Narnawre) यांनी दिली आहे.

प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचार्‍यांमधील कामाचा दर्जा व गुणवत्ता (Workers Development) वाढीला लागावी. प्रशासनात गतिमानता व सुधारणा व्हावी.

या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम (Training Programs) राबविला जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात कर्मचारी अधिकारी यांनी देखील काळानुरूप आपल्या कामकाजामध्ये बदल करणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर (Technical Use) करण्याबरोबरच त्याचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे बाब लक्षात घेत त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.

कर्मचार्‍यांच्या हिताला प्राधान्य देत नुकतेच विविध संवर्गातील निलंबित असलेले कर्मचारी यांच्या सेवा प्रस्थापित केले आहेत. यापूर्वी देखील ११ कर्मचार्‍यांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यात आलेल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या (Schedule Caste Tribe) मुला-मुलींच्या निवासी शाळेतील २१ कर्मचार्‍यांचा देखील नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावला.

कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्मचार्‍यांसाठी कौशल्य विकास, झिरो पेंडन्सी, विविध संवर्गाचे प्रशिक्षण, यासारखे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षापासून निलंबित असलेल्या सर्व सेवा पुनर्स्थापित केलेल्या कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे नारनवरे यांनी कळविले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com