परिवहन सेवेचे ऑनलाईन सर्वेक्षण

जनतेने सहभाग नोंदवावा; आयुक्त गोसावींचे आवाहन
परिवहन सेवेचे ऑनलाईन सर्वेक्षण

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुरक्षित, आरामदायी व सुरळीत बनवण्यासाठी परिवहन सेवेचे ऑनलाईन सर्वेक्षण ( Online survey of transport services ) केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज’ ( ‘Transport for All Challenges’ )या उपक्रमात मालेगाव मनपाने सहभाग घेतला आहे. यासाठी परिवहन समितीदेखील गठित करण्यात आली आहे. ऑनलाईन सर्वेक्षणात जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सर्वेक्षणासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी केले आहे.

मनपा आयुक्त दालनात परिवहन समितीची बैठक आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या बैठकीत केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणार्‍या ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंज या उपक्रमात मनपाने सहभाग घेतल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

या बैठकीस उपायुक्त राहुल पाटील, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, वैभव लोंढे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बोधले, परिवहन आगार व्यवस्थापक किरण धनवटे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास भोज, मन्सुरा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य शहजाद मोबीन, नगररचनाकार संजय जाधव, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, अभियंता महेश नेहरे आदीउपस्थित होते.

सार्वजनिक परिवहन सुरक्षित व आरामदायी बनवण्यासाठी जनतेचा विश्वास संपादन करून मनपातर्फे ऑनलाईन सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये नागरिक एका लिंकद्वारे आपले मत मांडू शकतात असे सांगून आयुक्त गोसावी म्हणाले, या मोहिमेंतर्गत मनपातर्फे टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये शहरातील वाहतूक व परिवहन संबंधातील विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, सामाजिक, शैक्षणिक संस्था व इतर सदस्यांचा समावेश असलेल्या परिवहन समितीचे गठन करण्यात आले आहे.

या समितीची बैठक घेण्यात येऊन कार्यक्रमासंदर्भात विचारविनिमय करून फिल्ड सर्वेमध्ये प्रत्येक वर्गातील लोकांचा सहभाग या सर्वेक्षणात कशा प्रकारे नोंदवता येईल यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले.स्मार्ट सिटी प्रकल्पानुसार सार्वजनिक परिवहन सेवा उत्तम होण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्वेक्षण मोलाचे ठरणार आहे. त्यामुळे सदर सर्वेक्षणात जनतेने आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त गोसावी यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com