लसीकरण न करताच ऑनलाईन नोंदणी

संबंधित दहा शिक्षकांचे निलंबन
लसीकरण न करताच ऑनलाईन नोंदणी

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

करोना प्रतिबंधक लस (corona preventive vaccine) न घेताच 13 जणांची ऑनलाईनवर नोंदणी (online register) करण्याचा धक्कादायक प्रकार संगमेश्वरातील (sangameshwar) आरोग्य केंद्रात (health center) घडल्याचे चौकशी दरम्यान उघडकीस आले आहे.

याप्रकरणी आपत्ती निवारणाच्या कामात निष्काळजीपणे काम करत राष्ट्रीय कामात हलगर्जीपणा करत अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत मनपा शिक्षण मंडळाचे (municipal board of education) प्रशासन अधिकार्‍यांनी दहा शिक्षकांना (teatures) निलंबीत (suspended) करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, कर्तव्यात कसूर करणार्‍या उर्दु माध्यमाच्या दहा शिक्षकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

चौकशी पुर्ण झाल्यानंतरच सदर कारवाई मागे घेण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे सुतोवाच आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. निलंबनाची कारवाई होताच लसीकरण (vaccination) न करता ऑनलाईन नोंदणी करणार्‍या त्या 13 जणांचा शोध घेत त्यांचे लसीकरण करून घेतल्याचा खुलासा संबंधित शिक्षकांतर्फे सादर करण्यात आला आहे.

मात्र लसीकरण न करताच ऑनलाईन नोंदणी करण्यासारखा गंभीर प्रकार शिक्षकांतर्फेच झाला. तसेच मुख्याधिकारी व शिक्षकांच्या लसीकरण वाढविण्यासंदर्भात आयोजित बैठकीत देखील त्यांनी कारवाईवरून गोंधळ घातला. त्यामुळे मनपा प्रशासनातर्फे या कारवाई संदर्भात काय भुमिका घेतली जाते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

शहरात करोना (corona) प्रतिबंधक लस घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अवघे 25 टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट गाठता आले आहे. अशातच लस न घेता ऑनलाईन नोंदणी करून प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचा गंभीर प्रकार देखील उघडकीस आल्याने जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. शहरात करोनाचे संक्रमण नियंत्रणात असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जास्तीतजास्त लसीकरण होण्यासाठी मनपा आरोग्य विभागातर्फे (municipal health department) सातत्याने प्रयत्न केले जात आहे.

यासाठी संपुर्ण शहरात 47 ठिकाणी लसीकरण केंद्राची (vaccination center) उभारणी देखील करण्यात आली आहे. एकिकडे आरोग्य यंत्रणा लसीकरण वाढविण्यासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतांना दुसरीकडे मात्र लस न घेता ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जात असल्याचे संगमेश्वरमधील आरोग्य केंद्रात झालेल्या गैरप्रकारावरून उघडकीस आले आहे.

नोंदणीनुसार लसीचे सर्व डोस संपणे आवश्यक असतांना 13 डोसची एक व्हायल शिल्लक आढळून आली तसेच नोंदणी व लसीकरणाच्या आकडेवारीत तफावत आढळल्याने हा गैर प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी संबंधित दहा शिक्षकांना दोषी ठरवत शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एफ.डब्ल्यु. चव्हाण यांनी निलंबीत केले आहे. या संपुर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जोपर्यंत ही चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत निलंबनाची कारवाई मागे घेतली जाणार नसल्याचे आयुक्त गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com