विधी शाखेच्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु

12 जुलैपर्यंत अंतिम मुदत
विधी शाखेच्या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

बारावीनंतर पाच वर्षे कालावधीच्या एलएलबी विधी शाखेच्या (LLB Law Branch) शिक्षणक्रमात प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षेसाठी (CET exam) नोंदणी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना दि. 12 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज (Apply online) करता येणार आहे...

विधी शाखेत करिअर () करू इच्छिणार्‍या बारावी किंवा समकक्ष शिक्षणक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरू शकतील. अर्ज भरण्यास सुरवात झाली असली, तरी सीईटी परीक्षेच्या तारखेची घोषणा अद्यापपर्यंत केलेली नाही. ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे.

यात दीडशे गुणांसाठी एक पेपर घेतला जाईल. परीक्षेत लीगल अॅप्टिट्यूड (Legal Aptitude), लीगल रिझनिंग (Legal Reasoning) आणि लॉजिकल अॅॅण्ड अॅनॅलिटिकल रिझनिंग (Logical and Analytical Reasoning) या विषयांचे प्रश्न विचारले जातील. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी आणि इंग्रजी विषयाशी निगडित प्रश्नांचा समावेश असेल.

गणित विषयावर आधारित दहा प्रश्न असतील. गेल्या वर्षापर्यंत पहिल्या कॅपराउंडची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राखीव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी अवधी दिला होता. मात्र यंदा या तरतुदीत बदल केले असल्याचे सूचनापत्रातून स्पष्ट होते.

ज्या विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्र उपलब्ध आहे, अशाच विद्यार्थ्यांनी त्या-त्या राखीव प्रवर्गातून अर्ज करावेत व इतरांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्याच्या सूचना माहितीपत्रात दिल्या आहेत. जातवैधता प्रमाणपत्र (Caste Certificate)मुदत 31 मार्च 2022 पर्यंत असणाऱ्यांना अर्ज भरता येईल, असेही स्पष्ट केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com