अवघ्या १० मिनिटांच्या सभेत ३२ कोटींच्या कामांना मंजुरी

स्थायी समितीची ऑनलाईन बैठक
अवघ्या १० मिनिटांच्या सभेत ३२ कोटींच्या कामांना मंजुरी
USER

नाशिक | Nashik

नाशिक महानगर पालिकेच्‍या (Nashik NMC) स्थायी समितीच्या (Standing Committee Meeting) बैठकीत अवघ्या दहा मिनिटांत सुमारे 32 कोटी रूपयांच्या कामांना मंजूरी (32 Crore Work Sanction) देण्यात आली.

स्थायी समितीचे सभापती गणेश गिते (Ganesh Gite) यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची ऑनलाईन सभा (Online Meeting) आयोजित केली होती. या बैठकीच्या सुरुवातीला विषयपत्रिकेवरील सर्व कामांना मंजूरी देण्यात आली.

यावेळी नगरसेविका समीना मेमन (Corporater Sameena Menon) यांनी लसीकरणाच्या डोसचे (Vaccination) होणाऱ्या वाटपाचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र हा विषय महासभेवर चर्चेसाठी येणार असल्याची शक्‍यता असल्याचे सभापतींनी सांगितले आणि सभा आटोपती घेतली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com