‘सच प्रणाली’ अ‍ॅपचे ऑनलाईन उद्घाटन
नाशिक

‘सच प्रणाली’ अ‍ॅपचे ऑनलाईन उद्घाटन

सिन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कोविड रुग्ण तत्काळ शोधणे व उपचार होण्याकामी ‘सच प्रणाली’ ऑनलाईन अ‍ॅपचे उद्घाटन नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.

करोना प्रतिबंधात्मक पाश्वभूमीवर सिन्नर तालुका आढावा सभेप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती शोभाताई बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर,

जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य जगन भाबड, संगीता पावसे, भगवान पथवे, सुमन बर्डे, अधिकारी व सेवक उपस्थित होते.

‘सच अ‍ॅपद्वारे शारिरिकदृष्ट्या दुर्धर तथा इतर आजाराने बाधित असल्यास ते रुग्ण तत्काळ शोधण्यास मदत होणार आहे. या ही प्रणाली सिन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु करण्यात आली आहे.

सच अ‍ॅॅप विकसित करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राचे अभिनंदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी लीना बनसोड यांनी केले.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com