नाशिकच्या इस्कॉन मंदिरात ऑनलाइन जन्माष्टमी साजरी
नाशिक

नाशिकच्या इस्कॉन मंदिरात ऑनलाइन जन्माष्टमी साजरी

Farooque Pathan

Farooque Pathan

जुने नाशिक | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ 'इस्कॉन' तर्फे साजरा होणारा मोठा महोत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने जन्माष्टमीचा सोहळा हा ऑनलाईन साजरी करण्यात आला.

उत्सव फक्त आश्रमनिवासी भक्तांनी साजरा केला. मंदिरात न येण्याची सूचना पूर्वीच व्यवस्थापन समितीद्वारे करण्यात आली होती. जन्माष्टमी निमीत्त मंदीराची तसेच श्री राधा कृष्णांच्या विग्रहांची सुंदर सजावट करण्यात आली होती.

सकाळपासून मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम इस्कॉन नासिकच्या ऑफिशिअल फेसबुक पेज व युट्युब चॅनेल वर दर्शकांसाठी थेट प्रक्षेपित करण्यात आले.

पहाटे 5 वाजेच्या मंगल आरतीपासूनच सुरूवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती व श्रीमान शिक्षाष्टकम् प्रभूंचे श्रीमद भागवत प्रवचन झाले. सायंकाळी भाविकांनी श्री राधा कृष्णांच्या विग्रहांचा पंचामृताने अभिषेक केला. जन्माष्टमीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते.

रात्री 12 वाजता भगवान श्री कृष्णांना महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. भगवान श्रीकृष्णांना सायंकाळी सुमारे १०८ पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू ,लीलाप्रेम प्रभू, अद्भुत हरी प्रभू, गोपालानंद प्रभू, नृसिंह कृपा प्रभु, सार्वभौमकृष्ण प्रभू, मारुतीप्राण प्रभू, मुकुंद रस प्रभू, सुमेध पवार, नादिया कुमार दास, आणि इतर कृष्ण भक्तांनी अथक परिश्रम घेतले.

नाशिकच्या इस्कॉन मंदिरात ऑनलाइन जन्माष्टमी साजरी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com