शुभमंगल सावधान! वधूने दिली लग्नमंडपातून ऑनलाइन परिक्षा

शुभमंगल सावधान! वधूने दिली लग्नमंडपातून ऑनलाइन परिक्षा

देवळाली कॅम्प | Deolali Camp

करोना काळात (Corona Crisis) नोकरी, शालेय अभ्यास ऑनलाइन (Online Study) झालेला असताना बोहल्यावर चढणाऱ्या नवरीने ऑनलाइन परीक्षा (Online Exam) देऊन जीवनसाथी च्या गळ्यात आयुष्याची माळ घातल्याने उपस्थित मोजक्या वराडी मध्ये एकच चर्चा रंगली होती.

भारतीय सैनिक सेवा दलात (Indian Army) कार्यरत असलेल्या कोनाबे तालुका सिन्नर (Sinnar Taluka) येथील राहुल कचरु भागवत यांचा विवाह काल दि. १३ रोजी पळसे साखर कारखाना (Palse Sakhar Karkhana) येथील मंगल कार्यालय येथे होता.

करोनाचे संकट असल्याने मोजकेच पाहुणे यावेळी उपस्थित होते. सध्या शाळा आणि महाविद्यालय बंद (School Colleges Closed) असल्याने अभ्यास व परिक्षा देखील ऑनलाइन होत आहेत.

सिन्नर तालुक्यातील सुळेवाडी (Sule wadi) येथील शेतकरी बाळनाथ गंगाधर जाधव यांची कन्या तेजल ही आपल्या विवाह बंधनात अडकण्यापुर्वी तृतीय वर्षांचा वाणिज्य विभागाचा प्रथम पेपर काल मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने (Mobile Online Exam) विवाह ठिकाणाहून देत असल्याने लग्न सोहळ्यात चागलीच चर्चा रंगली होती.

शिक्षणाला व ज्ञानाला कायम तेवत ठेवत पुढील शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC Exam) देणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. राहुल देशाची सेवा करतो व तेजल प्रशासकीय अधिकारी बनून देशसेवा करण्याचे स्वप्न वधू तेजल चे आहे ही बाब पाहुणे मंडळीला भाऊन गेली.

भागवत व जाधव परिवारातील नातेवाईक तसेच नासाका बचाव कृती समिती अध्यक्ष विलास गायधनी यांचे सह विविध लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com