जिल्हयात ७९ कोटीचा ऑनलाइन वीज भरणा

३ लाख ६९ हजार ग्राहकांनी घरातूनच भरले बिल
वीज
वीज

नाशिक | Nashik

करोनाचा प्रादुर्भाव (Corona Crisis) वाढल्यानंतर वीज ग्राहकांकडून ऑनलाइन वीज बिल (Online Light Bill) भरण्यास प्रतिसाद मिळत आहे.

नाशिक (Nashik District) जिल्हयातील मालेगांव ( Malegaon) व नाशिक परिमंडळात (Nashik Mahavitran) तब्बल 3 लाख 63 हजार 958 ग्राहकांनी घरूनच 79 कोटी 15 लाख रुपयांचा वीज बिलांचा भरणा ऑनलाइद्वारे केला.

महावितरण कार्यालयात (Mahavitran Office) जाउन गर्दी टाळ्ल्याने ग्राहकांनी स्वत:बरोबरच इतरांच्याही सुरक्षेची काळजी घेतली आहे. करोना विषाणूच्या प्रसार थांबविण्यासाठी करण्यात आलेल्या संपूर्ण लॉकडाऊन (Lockdown) यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा एकवटल्या असतांनाच, नागरीकांना आपल्या घरातच थांबता यावे, त्यांना टीव्ही, फॅन, यासारख्या इत्यादी विजेवर चालणाऱ्या साधणांमुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये तसेच करोनाविरूध्दच्या या लढाईत हॉस्पीटलचा वीज पुरवठा अखंडित (Hospital Light Supply) रहावा यासाठी महावितरणचे सैनिकही करोना विषाणूच्या प्रतिकूल परिस्थितीत आपली जबाबदारी अंत्यंत चोखपणे पार पाडून अखंडित वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहे.

महावितरणची वेबसाईट व मोबाईल ऍपद्वारे (Mobile App) ’ऑनलाईन’ वीजबिल भरणार्‍या लघुदाब वीजग्राहकांची संख्या परिमंडळात 3 लाख 69 हजार 958 एवढी आहे. या ग्राहकांनी 79 कोटींचा भरणा घरबसल्या केला आहे. यामुळे वीज बिल भरण्यासाठी होणारी दमछाक मधून सुटका झाली.

वीजबिल भरणा निशुल्क करण्यात आला असून 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. ऑनलाईन वीज बिल भरण्यासाठी वीज ग्राहकांना महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल ऍपद्वारे वीजबिल भरण्याची सोय करण्यात आली आहे.

ऑनलाईन’ बिल भरणा निःशुल्क

क्रेडीट कार्ड (Credit Card) वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ’ऑनलाईन’ चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहे. याआधी नेटबॅकींगचा (Net Banking) अपवाद वगळता वीजबिलांचा ’ऑनलाईन’भरणा करण्यासाठी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते.

परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ’ऑनलाईन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेकांचा ओढा ऑनलाइनकडे वाढल्याचे दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com