ऑनलाईन शिक्षण
ऑनलाईन शिक्षण
नाशिक

ऑनलाइन शिक्षणामुळे पालकच झाले शिक्षक

विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण

Gokul Pawar

Gokul Pawar

कवडदरा । Kawaddara

करोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सध्या ऑनलाइन शिक्षण उपक्रमात शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार घरोघरी पालकच सहाय्यक शिक्षकाची भूमिका बजावताना दिसत आहे.

करोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महामारीचा समाजातील प्रत्येक घटकाला फटका बसला आहे. यामध्ये यंदाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असले तरी शाळा अद्याप बंद आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाचे वेळापत्रक कोलमडले आहे.

करोनाचा प्रसार वाढतच आहे. त्यामुळे शाळा सुरू होणे अनिश्‍चित आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यास थांबू नये म्हणून शिक्षण विभागाच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षक आपापल्या वर्गाचे व्हॉटस्‌ऍप ग्रुप तसेच झुम मिटिंगद्वारे विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधत आहेत. ऑनलाईन अभ्यास प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील मुख्य दुवा म्हणून पालक जबाबदारी पार पाडत आहेत.

अँड्रॉइड मोबाईल शक्‍यतो पालकांकडेच आहेत. जेंव्हा पालक घरी असतील तेव्हांच मुलांना मोबाईल हातात मिळतो. परंतु, आपल्या मुलाचा अभ्यास आपल्या मोबाईलवर येतोय हे पालकांना समजले आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर असणारे बहुतांशी पालक पाल्याच्या अभ्यासासाठी बाहेरील काम आटोपून वेळेत घरी जात आहेत. वैयक्तिक तसेच शेतीच्या कामातून वेळ काढून पालक सध्या मुलांच्या अभ्यासासाठी शिक्षकाची भूमिका पार पाडताना दिसत आहेत.

मोबाईलवरून रोजचा अभ्यास पालक समजावून घेत आहेत. नंतर पाल्याकडून तो अभ्यास करून घेत आहेत. शाळेत शिक्षक अन्‌ थेट विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असते. परंतु, ऑनलाईनमुळे आता शिक्षक-पालक यांच्यामध्ये आंतरक्रिया अगोदर व नंतर पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया होत आहे. त्यामुळे पालकांना सहाय्यक शिक्षकाची भूमिका करावी लागत आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षण संकल्पना ग्रामीण भागात मोबाईल इंटरनेट सुविधा चांगल्या प्रकारची नसल्यामुळे मुंलाना ऑनलाईन शिक्षण मिळत नाही.

- सुजय रोंगटे, पालक, कवडदरा

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com