सप्तशृंगी देवीचे ऑनलाईन दर्शन

मंदिर अद्यापही बंद
सप्तशृंगी देवीचे ऑनलाईन दर्शन

दिंडोरी । Dindori

करोनाच्या पार्श्वभुमीवर (Corona Crisis) गडावरील सप्तशृंगी आणि वणीची जगदंबा देवी (Saptsrungi Devi Temple) मंदिरात गर्दी होऊन संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशान्वये दर्शनासाठी मंदिर बंद (Temple Closed) करण्यात आले आहे.

त्यामुळे भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी असली तरी ऑनलाईन दर्शनाच्या (Online Darshan) माध्यमातून भाविकांची दर्शनाची इच्छा पुर्ण करण्यात येत आहे.

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या भक्तांची संख्या देशभर आहे. प्रामुख्याने गुजरात व महाराष्ट्रातील बहुसंख्य भाविक या देवीला कुलदैवत मानतात.

चैत्र यात्रोत्सव व नवरात्र (Navratri) अशा दोन उत्सवात लाखोंच्या संख्येने हजेरी असते तर उर्वरीत दिवसांतही हजारो भाविक सप्तशृंगीच्या दर्शनासाठी उपस्थित असतात.

तसेच वणीची जगदंबा देवी ही सप्तशृंगी देवीची ज्येष्ठ भगिनी असल्याची मान्यता भाविक भक्त व दर्शनार्थी यांना दर्शनप्राप्तीचा आनंद प्राप्त व्हावा, यासाठी देवीचा साजश्रृंगार पुरोहितांच्या हस्ते पुर्ण झाल्यानंतर देवीचा फोटो काढून सोशल मीडीयावर पोस्ट करण्यात येतो व नित्यनेमाने भाविक दर्शन घेऊन कृतकृत्यता अनुभवतात. दर्शनाची अनुभूती या भावनेतून होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com