मराठी संवर्धन पंधरवड्यात ऑनलाइन स्पर्धा

मराठी संवर्धन पंधरवड्यात ऑनलाइन स्पर्धा

ओझर । वार्ताहर Ozer

येथील मविप्र (MVP) समाजाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र् शासन (maharashtra government) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मराठी विभागाच्या (Marathi section) वतीने दि.14 ते 28 जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ (Marathi language conservation fortnight) साजरा करण्यात आला.

महाविद्यालयीन स्तरावर यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन ऑनलाइन (online) पद्धतीने घेण्यात आले. ऑनलाइन निबंध स्पर्धा (Online essay competition) घेण्यात आली. त्यासाठी नवे शैक्षणिक धोरण (New educational policy), कोविड 19 (covid-19) काळातील आपले अनुभव व माझा मराठाची बोलु कौतुके हे तीन विषय देण्यात आले. कोणत्याही एका विषयावर लेखन करून ऑनलाइन पद्धतीने पीडीएफ (PDF) स्वरूपात मागविण्यात आले. तसेच स्वरचित काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली.

आपआपल्या गावांच्या नावाच्या आख्यायिकांचे संकलन करण्यात आले. समाजात प्रत्यक्ष बोलल्या जाणार्‍या म्हणी, उखाणे आणि वाक्प्रचाराचे संकलन करण्यात आले. परिसरातील लोकसाहित्याचे व आपआपल्या गावातील देवी देवता आणि देवळांच्या आख्यायिका यांचे संकलन करण्यात आले. तसेच प्रा.व्ही.बी. राठोड यांनी ‘मराठी भाषेचे महत्व’ या विषयावर व डॉ.उषा सोरते यांनी ‘बोली भाषेचे महत्व’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान दिले.

विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळावे म्हणून महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने वर्षभर भित्तिपत्रक चालविले जाते. यात विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कथा, कविता, लेख, विचार प्रकाशित केले जातात. यातील उत्कृष्ठ लेखांना महाविद्यालयाच्या ‘पुष्पक’ या वार्षिक अंकातून प्रसिद्ध केले जाते. भित्तिपत्रकाचे औपचारिक उद्घाटन प्राचार्य डॉ.एस.एस. काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य डॉ.युवराज जाधव, नॅक समन्वयक डॉ.पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ.दत्तात्रेय गोडगे उपस्थित होते. गुगल फॉर्मच्या माध्यमातून मराठी भाषेवर आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात आली. यात एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले. यात एकूण 83 मुलांनी सहभाग नोंदविला. वरील सर्व उपक्रमात भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

मराठी भाषेतून लिखाण करतांना शुद्ध स्वरुपात करता यावे म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र साहित्य महामंडळाने दिलेले शुद्धलेखन विषयक नियमांचे लेखन हस्तलिखित स्वरूपात करून घेतले. भाषा संवर्धन पंधरवडाच्या निमित्ताने घेतलेल्या सर्व उपक्रमांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस. काळे यांनी मार्गदर्शन केले. वरील सर्व कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉ.उषा सोरते व प्रा.व्ही.बी. राठोड यांनी काम केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com