कौतुकास्पद ! अंगणवाड्यांचा ऑनलाईन बाल सप्ताह

महिला बालकल्याण, एम्परसँडचा उपक्रम
कौतुकास्पद ! अंगणवाड्यांचा ऑनलाईन बाल सप्ताह

नाशिक | Nashik

महिला व बालकल्याण मंत्रालय सोबतच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी अंतर्गत नाशिकच्या अंगणवाड्यांमध्ये एम्परसँड समूहातर्फे ऑनलाईन बाल सप्ताह साजरा करण्यात आला.

यामध्ये शहरातील 25 अंगणवाड्यांचा सहभाग असून 600 मुलांचा समावेश आहे. कोविड 19 या साथीच्या आजारामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन हा उत्सव साजरा करण्यात आला.

एम्परसँड समूहाने विद्यार्थ्यांना हॅप्पी चिल्ड्रन डे टॅग करुन ऑनलाइन संदेश सामायिक आणि पोस्ट करत उत्सव साजरा केला. वयाने मोठे असलेल्या विद्यार्थ्यांनीही साथीच्या आजारावेळी ऑनलाइन व्याख्यान आयोजित केल्याबद्दल शिक्षकांबद्दल आभार मानून प्रेरणादायी संदेश पाठवले.

विद्यार्थ्यांनी त्यांचे कविता पठण करणारे व्हिडिओ अपलोड केले, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखी वेशभूषा केली तसेच त्यांची छायाचित्रे रेखाटली. त्यांनी त्यांच्या महत्वाकांक्षा, रेखाचित्रे व्हिडिओ मार्फत सादर केले.

महिला व बालकल्याण मंत्रालयच्या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रेरणादायी संदेश ऑनलाईन पाठवले आहेत.

नाशिक महिला व बालविकास मंत्रालयाचे बालविकास प्रकल्प अधिकारी चंद्रशेखर पगारे, म्हणाले, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मुलांचे शैक्षणिक अभ्यासात मन रमल्याने ते त्यात व्यस्त राहतील. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून ते महत्वकांक्षी बनण्यास प्रोत्साहित होतील.

21 व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाइन व्यासपीठावर चालणार्‍या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होईल.

एम्परसँड समूहाच्या संचालिका, प्रशिक्षक डॉ. रिटा सोनवत म्हणाल्या, लॉकडाऊन दरम्यान शिक्षणात सातत्य कायम ठेवण्यात आमच्या शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले आहे.

तसेच शैक्षणिक व शिक्षणाचे नवीन मार्ग बदलत आहेत. परस्पर संवादात्मक डिजिटल तंत्रज्ञानाच्या अत्यंत मनोरंजक वापराद्वारे मुलांमध्ये सर्वांगीण विकास वाढविण्याच्या उद्देशाने हा ऑनलाईन उपक्रम म्हणजेच बाल सप्ताह उत्सव.

यामुळे मुले, पालक आणि शिक्षक यांच्यामधील परस्पर संबंध बळकट होतील आणि सामाजिक आणि भावनिक विकासास मदत होईल.

वर्षानुवर्षे कृषी योजनांचा लाभासाठी होणारी हेळसांड थांबविण्यासाठी शासनाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध केल्याने नक्कीच शेतकरी हित साधले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना सर्व माहिती घरपोच मिळणार असून लाभ देण्यात पारदर्शकता येणार आहे.

- संजय बनकर, सभापती जिल्हा परिषद नाशिक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com