
येवला | प्रतिनिधी | Yeola
महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पावसाने (rain) सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे. यामुळे बळीराजा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडला आहे.
चार-चार महिने कष्ट करून, हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी पुरता त्रस्त आणि चिंताग्रस्त झाला आहे.
या अवकाळीचा फटका नाशिक जिल्ह्यालाही (Nashik District) मोठ्या प्रमाणात बसला आहे. येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार धडक दिली आहे.
यामुळे शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले पिक हातून सोडून द्यावे लागत आहे. अंदरसुल गावातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी गोरख सोनवणे यांनी आपला कांदा भिजला असल्याने त्याला आता काहीच भाव मिळणार नाही, बाजार समितीत घेऊन जाणेही परवडणारे नसल्याने शेळ्यांपुढे सोडून दिला आहे. अशी वाईट वेळ या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.