लासलगाव।वार्ताहर

नाशिक येथील कांदा व्यापारी सागर कैलास वाघ यांना केरळ येथील ब्लू पँथर स्पायसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लि.टेडचे मालक अजय शंकर एम. के. यांनी 14 लाख 17 हजार 500 रुपयांचा कांदा खरेदी करून पैसे देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा गुन्हा लासलगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

दुसर्या घटनेत गायत्री ट्रेडिंग कंपनीचे मालक आनंदा सोपान जाधव यांनी कांदा व्यापारी दिगंबर रकिबे (रा. धोडांबे) यांना कांदा विक्री केला होता. यांचे या व्यवहारातील कांदा विक्रीचे राहिलेले 5 लाख 35 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कांदा व्यापारी सागर कैलास वाघ यांचा एस. के. ट्रेडिंग कंपनी, विंचूर येथे कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. अजय शंकर एम. के. यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीने बाजार समिती विंचूर येथून खरेदी केलेला कांदा केरळ येथील ब्लू पँथर स्पायसेस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने पाठविलेल्या कंटेनरमध्ये 14 लाख 17 हजार 500 रुपयांचा 81 मॅट्रिक टन कांदा घेऊन गेले. कांदा ऑर्डरप्रमाणे पोहोच झाल्यानंतर कांदा खरेदीचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने गुन्हा दाखल केला आहे.