कसबे सुकेणे येथून बांग्लादेशसाठी कांदा रवाना

गुड्स शेड परिसंचारी क्षेत्र सुरु
कसबे सुकेणे येथून बांग्लादेशसाठी कांदा रवाना

नाशिक | Nashik

नाशिक जिल्यातील कांदा हा बांगलादेशात पाठविण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक वेळेत कसबे सुकेणे येथे गुड्स शेड परिसंचारी क्षेत्र सहित सुरू करण्यात आले.

मध्य रेल्वे च्या भुसावळ विभागा मधील व्यवसाय विकास युनिट ला आणखी एक यश प्राप्त झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कसबे सुकेणे येथे गुड्स शेड चा विकास परिसंचारी क्षेत्र सहित आठवड्या भरात युद्धपातळीवर करण्यात आला आले.

४२ वॅगनचा पहिला रॅक (दि.२८) रोजी कसबे सुकेणे स्थानका वरून बांगलादेशच्या दर्शना या स्थानका साठी रवाना करण्यात आला.

कसबे सुकेणे येथे नवीन गुड्स शेड बनल्या मुळे शेतकरी व व्यापाऱ्यांना त्यांचे उत्पादन भारतात विक्री करण्यात मदत होईल व निर्यात ही करता येईल. मध्य रेल्वेने आतापर्यंत बांगलादेशसाठी कांद्याचे 71 रॅक रवाना करण्यात आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com