विंचुरला वादळी पावसाने कांदा शेड जमीनदोस्त

कांद्याचेही नुकसान
विंचुरला वादळी पावसाने कांदा शेड जमीनदोस्त

विंचुर । Vinchur

विंचूर व परिसरात रविवारी दोन वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसाने विंचूर उपबाजार समितीच्या व्यापार्‍यांचे नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेले कांद्यांचे दहा शेड जमिनदोस्त झाले.

त्याचबरोबर शेतकर्‍यांचा साठवणूक करुन उरलेला कांदा भिजल्याने शेतकर्‍यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. करोनाचे सावट असल्याने बाजार समिती गेली दहा ते बारा दिवस बंद होती. आता बाजार समिती सुरु झाली. परंतु​ शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी जायचे असेल तर करोना चाचणी करून जावे, अशी नियमावली बाजार समितीने केल्याने बरेच शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजार समितीत जात नसून थांबलेले आहे.

त्यामुळे कांदा साठवणूक करून उरलेला कांदा पडून आहे. आज दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे कांदा झाकण्यासाठी शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली. आधीच लॉकडाउन असल्याने दुकाने बंद आहे. त्यामुळे कांदा झाकण्यासाठी ताडपत्री मिळत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे हाल होत आहे.

सलग दोन दिवसापासून होत असलेल्या वादळी पावसाने शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार असला तरी येथील कांदा व्यापार्‍यांचे कांदा शेडचे नुकसान झाल्याने व्यापारी वर्गावर अर्थिक संकट ओढावलेले आहे. नुकसानी मुळे आजपासून पुढील सूचना मिळेपर्यंत कांदा व धान्य लिलाव बंद राहतील असे व्यापारी वर्गाकडुन सांगण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com