नाफेडच्या माध्यमातून वणी येथे कांदा खरेदी केंद्र

कांदा खरेदी केंद्राचे खा.डॉ.भारती पवारांच्या हस्ते उदघाटन
नाफेडच्या माध्यमातून वणी येथे कांदा खरेदी केंद्र

नाशिक । प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी केंद्रासरकारच्या माध्यमातून ज्या योजना आल्या आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून त्याचा फायदा घ्या आणि भविष्यात ही पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमीच पाठीशी राहतील.शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचा आधार घेऊन आपल्या शेतीमालाची विक्री करावी असे आवाहन खा.डॉ.भारती पवार यांनी केले.नाफेडच्या माध्यमातून वणी (ता.दिंडोरी)येथे कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या खरेदी केंद्राचे खा.डॉ.भारती पवारांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

लॉकडाऊनच्या काळात शेतीमालाचे भाव कमी झाले होते.त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला.परंतु, पंतप्रधान नरेंद मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले त्याचाच एक भाग म्हणून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले .याचाच परिपाक म्हणून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नवीन नाफेडची कांदा खरेदी केंद्राला सुरवात झाली.यामुळे कांद्याला नक्कीच चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल.

मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी सुमारे दीड लाख मेट्रिक टन कांदा नाफेड खरेदी करणार असून खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची कांदा खरेदी झाली आहे त्यांचे पैसे लगेच 24 तासाच्या आत त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होईल. "शेतकऱ्यांनी केंद्रासरकारच्या माध्यमातून ज्या योजना आल्या आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून त्याचा फायदा घ्या. भविष्यातही नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमीच पाठीशी आहे.शेतकऱ्यांनी कृषी कायद्याचा आधार घेऊन आपल्या शेतीमालाची विक्री करावी "असे प्रतिपादन खा.डॉ. पवार यांनी या प्रसंगी केले.

या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पाटील, सभापती दत्तात्रय पाटील, उप सभापती अनिल देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, नाफेड चे अधिकारी शैलेंद्र कुमार, सुशीलकुमार, प.स.उपसभापती उत्तमराव जाधव, म्हेळुस्केचे सरपंच योगेश बर्डे, मनीष बोरा, शिवाजी बाबा पिंगळ, वसंतराव जाधव, सुभाष मेधने, पंडितराव बागुल, नंदलाल चोपडा, अमित चोरडिया, गुलाबराव जाधव, डॉ. टिळेकर ताई आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com