मजुरांची पळवापळवी; कांदा उत्पादक हवालदिल

मजुरांची पळवापळवी; कांदा उत्पादक हवालदिल
File Photo

नाशिक | विजय गिते Nashik

कामधंदा नाही म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलीय, अशी ओरड सर्वस्तरातून होत आहे. मात्र, ही ओरड पूर्णतः चुकीची आहे, असे चित्र जिल्ह्यातील विशेषतः कांदा पट्ट्यात आहे.

सद्यस्थितीत शेतात भरपूर कामे आहेत.परंतु, शेतमजूर मिळत नाही,असे चित्र निफाड, येवला, मनमाड, नांदगाव,चांदवड परिसरासह ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. मुबलक पाणी,चांगला भाव यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात लेट खरीप (रांगडा), उन्हाळ कांदा लागवड सुरू आहे. मात्र, मजूरटंचाई आणि वीजबिल वसुलीसाठी ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे धोरण वीज वितरणने स्वीकारल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. संकटांची ही मालिका थांबणार केव्हा? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे....

जिल्ह्यात लागोपाठ आलेल्या अतीवृष्टी, रोगट हवामान आणि अवकाळी अशा संकटांनी खरीप हंगामासह कादा रोपाची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे. द्राक्ष, डाळिंब, मका, बाजरी याबरोबरच भाजीपाल्याचे झालेल्या नुकसानीची मालिका सहन करत शेतकरी रांगडा,उन्हाळ कांद्याची लागवड करत आहेत. कधी हसविणारा तर कधी रडविणार्‍या कांद्याने यावर्षी ऐन लागवडीच्या मोसमातच शेतकर्‍यांना रडविण्याची वेळ आणून ठेवली आहे.

कांदा लागवडीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.दामदुप्पट मजुरी देण्याची तयारी दाखवून देखील मजूर उपलब्ध होत नसल्याने लागवड करायची तरी कशी ? असा प्रश्न अनेक उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे.गहू, हरभर्‍यासह उन्हाळ कांद्यावरच शेतकर्‍यांची पूर्ण मदार असते.

कांद्यास चांगला भाव मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात आहे. बहुताश शेतकर्‍यांचे अर्थचक्र कांद्यामुळेच फिरत असल्याने त्याच्या लागवडीस प्रथम प्राधान्य दिले जाते. कांद्यात देखील भांव देवून जाणारा उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात लागवड करण्याकडे शेतकर्‍यांचा कल राहिला आहे.तीन वर्षांपासून चांगला, दमदार पाऊस होत आहे.यावर्षी तर काही भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पाण्याचा मुबलक साठा आहे. त्यामुळे खरिपाचा हंगाम हातातून गेला असला तरी शेतकरयांच्या सर्व आशा आता रब्बीच्या हंगामावर विशेषतः कांदा पिकावर आहे.

उन्हाळ कांद्याला यावर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने यदा उन्हाळी कांद्याच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.रब्बी,रांगडा कांद्याची काढणी तसेच उन्हाळ कांद्याची लागवड होत आहे.सर्वत्र लागवड चालू असल्यामुळे मजूर टचाई निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com