
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सद्यःस्थितीत कांद्याच्या (onion) पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेड मार्फत कांदा खरेदी प्रक्रिया (Onion buying process) तत्काळ राबविण्यात यावी.
यासाठी आपला आग्रह असुन वाणिाज्य मंंत्री पीयूष गोयल (Commerce Minister Piyush Goyal) यांचेही लक्ष वेधले आहे. सध्या इतर देशातील आर्थीक परीस्थती हलाखाची असल्याने त्याचाही परीणाम कांद्यांच्या निर्यातीवर (export of onions) होत आहे. असे आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी स्पष्ट केले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या अर्थसंंकंल्पाचे विविध वैशीष्ट्य विषद करण्यासाठी आज डॉ. पवार यांंनी पत्रकार परीषद घेतली. त्यावेळी कांदा प्रश्नावर त्यांचे लक्ष्य वेधले असता त्यांनी वरील माहीती दिली.
त्या म्हणाल्या समृद्ध भारत या संकल्पनेतून अमृत महोत्सव साजरा करत असताना त्या दृष्टीने अमृत्काल बजेट (Amritkal Budget) सादर केले आहे, आर्थिक विकास दर (Economic growth rate) 7 टक्क्यांपर्यंत जाण्याचे अनुमान यात आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी अनेक संकटातून बाहेर येत एक दिशादर्शक बजेट दिले आहे. भारताच्या सर्वागीण विचाराचे दर्शन यातुन घडले आहे.
डिजिटल क्रांती (Digital revolution) झालेल आता दिसत आहे. मोफत अन्न धान्यासाठी दोन लाख कोटेीची तरतुद केली आहे. जगात आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आली आहे. स्वच्छ भारत मिशन (Swachh Bharat Mission) 11 कोटी कुटुंबांना मदत केली. 7 वर्षात 2.79 करोड लोकांना घर दिले. जलजिवण मिशन (Jaljeevan Mission) मधून पाण्याची व्यवस्था केली.
47 कोटीपेक्षा जास्त बँकेची खती जनधनची उघडली गेली.11 कोटी शेतकर्यांना मदत केली गेली आहे. सर्वसमावेशक विकासाचे ध्येय आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. यावेेळी आ. राहुल ढिकले, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, विजय साने,शहराध्यक्ष गिरीश पालवे,सुनील केदार, जगन पाटील, प्रशंांत जाधव, पवन भुगरकर,सुनील देसाई,संतोष नेरे आदी उपस्थीत होते.