
येवला । प्रतिनिधी | Yevla
येवला बाजार समितीत (Yevla Market Committee) कांद्याला (onion) प्रतिक्विंटल 350 ते 450 रुपये भाव पुकारण्यात आला. संतप्त शेतकऱ्यांनी (farmers) लिलाव (auction) बंद पाडत रास्तारोको आंदोलन (agitation) केले.
जादा दर दाखवण्यासाठी व्यापारी एखादा ट्रॅक्टर (tractor) जादा दराने घेतात, मात्र बाकीचे मातीमोल भावाने खरेदी करून शेतकर्यांना लुटले जात आहे. कांद्याचे भाव (Onion price) दिवसेंदिवस खाली जात आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत विक्री झालेल्या कांद्यास प्रति क्विंटल 1 हजार रुपये अनुदान (subsidy) द्यावे या मागणीसाठी आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने (Self-respecting Republican Party) शतकर्यांसह निदर्शने केली.
तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी बोलताना सांगितले की, सध्या कांद्याचे भाव दिवसेंदिवस गडगडत आहेत. उत्पादन खर्च दुपटीने अधिक आहे. केंद्र शासनाच्या (central government) शेतकरी विरोधी धोरणापाई शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कांदा पिकवण्यासाठी महागडे औषधे, महागडे रासायनिक खते, महागडी रोपे, वाढती मजुरी हे शेतकर्यांना (farmers) न परवडणारे असून त्यातच रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकरी वैतागवून गेलेला आहे.
त्याआधीच दोन वर्ष कोरोनाच्या (corona) काळात अडचणीत आलेला शेतकरी मात्र एकदमच काद्याला दर मिळत नसल्याने आर्थिक संकटात सापडलेला आहे. कांदा पिकविण्यासाठी (onion crop) एकरी साधारण 35 ते 40 हजार रुपये खर्च झालेला असून आज रोजी मात्र 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल अशा भावात त्याचा कांदा बाजार समितीत आणून विकावा लागत आह.
कांद्याचे निर्यात शुल्क शून्य करून निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, 1 जानेवारी पासून विकलेल्या कांद्याला 1 हजार रुपये अनुदान राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी जाहीर करावे, नाफेड अंतर्गत कांदा खरेदी चालू करावी, कांदाला हमीभाव जाहीर करावा आशा मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी विजय घोडेराव, बाळासाहेब आहिरे, अजहरभाई शेख, विनोद त्रिभुवन, मयुर सोनवणे, विजय पगारे, बाळासाहेब सोनवणे, आशाताई आहेर, अँड स्मिता झाल्टे, सरिताताई शिरूड, व शेतकरी उपस्थित होते.
कांदा अग्निडाग समारंभ
कांद्याला भाव मिळत नसल्याने कृष्णा डोंगरे याने येत्या 6 मार्च रोजी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रण दिले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल जवळील मातुलठाण या गावी समारंभाचे ठिकाण आहे.या कार्यक्रमाच्या जाहीर निमंत्रण पत्रिका छापल्या असून सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहेत.