निर्यात बंदी उठताच कांदा भावात ४७० रुपयांची वाढ

निर्यात बंदी उठताच कांदा भावात ४७० रुपयांची वाढ


लासलगाव | Lasalgoan

निर्यात बंदी उठताच कांदा भावात येथील मुख्य बाजार समितीत ४७० रुपयांची तेजी दिसून आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता.

सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले होते. मात्र काल पियुष गोयल यांनी ट्विट करत कांद्यावरील निर्यात बंदी १०५ दिवसांनंतर हटवली असून त्याचाच परिणाम कांदा भाव वाढीवर झाला आहे.

आज लाल कांद्याला कमाल २५५०रुपये तर सरासरी २२०० प्रति क्विंटल भाव मिळाला.सद्या, दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, तब्बल १०५ दिवसांनतर निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात ४७० रुपयांची वाढ झाली आहे. निर्यातबंदी उठवल्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अडीच महिन्यांनतर कांद्याचा भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. लासलगाव येथील बाजारामध्ये कांद्याचा कमाल भाव प्रतिक्विंटल २५५० रुपये असून किमान भाव १००० रुपये आहे .तर सर्वसाधारण भाव प्रतिक्विंटलमागे २२०० रुपये इतका आहे.

सप्टेंबरमध्ये घाऊक बाजारात कांदा दरात वाढ होताच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली होती.

यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक होऊन रस्त्यावर देखील उतरले होते. तर, विरोधी पक्षांनी देखील या निर्णयाचा निषेध केला होता. १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचा २०२० चा शेवट या गोड बातमीने झाला असून कांदा दरात वाढही झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com