Onion Chawl, Panchale-Sinnar
Onion Chawl, Panchale-Sinnar|The stored onion began to rot
नाशिक

भाव नसल्याने कांदा सडतोय

शेतकऱ्याना बसतोय आर्थिक फटका

Vilas Patil

Vilas Patil

पंचाळे | वार्ताहर Sinnar / Panchale

बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडू लागला असून शेतकऱ्याना मोठा आर्थिक फटका बसतो आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती. साधारणत: हजार रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री होईल या भरोशावर शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कांदा चाळीमध्ये साठवला होता. मात्र, मार्चपासून करोनाच्या संकटामुळे बाजार समित्या अनियमितपणे सुरू आहेत. त्यामुळे कांदा विक्री करण्यात अडथळा निर्माण होत असून त्याचा परिणाम दर घसरणीवर झाला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी मार्च-एप्रिलमध्ये तयार झालेला कांदा चाळीमध्ये साठवला. मात्र, अद्यापही कांद्याच्या भावात सुधारणा झालेली नाही. एका पायलीच्या रोपास खरेदीसाठी दहा हजार रुपये, एकरी लागवड खर्च दहा हजार रुपये, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत यावरही मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

खर्चापेक्षाही उत्पन्न कमी होत असल्याने शेतकऱ्यांना तोटा होत आहे. त्यामुळे यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाने हस्तक्षेप करून कांद्यास 10 ते 15 रुपये भावाने खरेदी करावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com