कांदा उत्पादक धास्तावले

कांदा उत्पादक धास्तावले

कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene

लाल कांदा (red onion) बाजारपेठेत सुरू असतानाच उन्हाळ कांदा (summer onion) देखील विक्रीसाठी येवू लागल्याने कांद्याचे भाव दिवसागणिक कमी होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसात कांद्याचे भाव 500 ते 700 रुपयांनी कमी झाल्याने

मिळणार्‍या बाजारभावात उत्पादन खर्च फिटणे देखील अवघड झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने (central government) कांदा निर्यात (Onion exports) वाढवून कांद्याला किमान 2500 रु. भाव जाहिर करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे (District President of Farmers Association Arjun Borade) यांचेसह पदाधिकार्‍यांनी केली आहे.

यावर्षी लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांद्याची देखील मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. कांदा उत्पादक (Onion growers) शेतकर्‍यांना कांदा बाजारभावाबाबत मोठी आशा असून खर्‍या अर्थाने उन्हाळ कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येणे बाकी असतानाच कांद्याचे भाव मात्र गडगडले आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी (farmers) करोना (corona) संकटाचा मोठा सामना करत महागडे कांद्याची बियाणे,

कांदा लागवडीत झालेला भरमसाठ खर्च, खते, औषधांच्या वाढलेल्या किमती, निंदणी, काढणी आणि वाहतूक याचा खर्च विचारात घेता आजच्या बाजारभावात कांद्यावरील उत्पादन खर्चही फिटणे अवघड झाले आहे. त्यातच लाल कांदा हा टिकावू नसल्याने तो काढणीनंतर लागलीच विक्री करावा लागतो. साहजिकच लाल कांदा काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यावर येत असतांना उन्हाळ कांद्याचे देखील बाजारपेठेत आगमन झाले आहे. निसर्गनियमानुसार बाजारपेठेत आवक वाढते तेव्हा भाव पडतात.

साहजिकच आत्ताही त्याची प्रचिती शेतकर्‍यांना येत आहे. त्यामुळे उन्हाळ कांदा (summer onion) हा टिकावू असल्याने शेतकर्‍यांनी सदरचा कांदा हा चाळीत साठवून ठेवावा व गरजेनुसार टप्प्याटप्प्याने विक्री करावा. जेणेकरून बाजारपेठेतील आवक स्थिर राहून भाव देखील टिकून राहण्यास मदत होईल. परंतु आजचे कांद्याचे बाजारभाव बघता कांद्यावर झालेला खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे किमान कांदा पिकाचा खर्च भरून निघावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याबरोबरच कांद्याला किमान 2500 रु. हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे यांचेसह शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com