कांदा निर्यात वाहतूक खर्च कपातीची घोषणा हवेतच

कांदा निर्यात वाहतूक खर्च कपातीची घोषणा हवेतच

पिंपळगाव ब.। वार्ताहर Pimpalgaon Basvant

कांदा वाहतूक खर्चात गेल्या सात-आठ वर्षात इंधन दरातील वाढीच्या (Increase in Fuel Prices ) मुख्य कारणामुळे दीडपट तरी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सन 2015 मध्ये असणारा प्रतिटन 9 हजार रुपये हा माहवाहतुकीच्या कांद्याचा दर ( Onion Rate ) आता 14 हजार रुपयांवर जावून पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी यांनी पिंपळगावच्या सभेत कांदा निर्यातीला येणार्‍या वाहतूक खर्चात कपात करण्याची घोषणा केली होती. परंतु या घोषणेलाही केंद्र सरकारकडून चिकटपट्टी लागलेली आहे.

लासलगाव ( Lasalgon )येथे कांद्याची प्रचंड आवक होते आणि खरेदी झालेला कांदा प्रतवारी करून पॅकिंग करून तो मालट्रक, कंटेनर अगर रेल्वे बोगीने देशात आणि काही प्रमाणात विदेशातही पाठवतात. कांदा वाहतुकीचा दर वाढण्याचे प्रमुख कारण तर आहेच त्याचबरोबर कांदा भरणे आणि तो वाहनातून उतरविणे या मजुरीत झालेली वाढही लक्षणीय आहे. इंधनाच्या दरात जवळपास 50 टक्के झालेली वाढ व त्यामुळे आज 96 रु. प्रतिलिटर दराने डिझेल खरेदी करावे लागते.

कांदा वाहतुकीच्या बाबतीत शेतकर्‍यांच्या शेतावरून ते बाजार समितीपर्यंत प्रथमत: शेतकरी खर्च करतो. या खर्चात काही शेतकर्‍यांकडे वाहनेही नसून ते भाड्याची वाहने वापरतात. त्यामुळे पूर्वीच्या खर्चात व आताच्या खर्चात जवळपास 50 टक्के वाढ झालेली आहे. परदेशात म्हणजे मलेशिया, दुबई, सिंगापूर या ठिकाणी निर्यात ( Onion Export ) होणार्‍या कांद्याची मात्र वाहतूक आता कंटेनरने केली जाते. हे कंटेनर मुंबई येथून येत असल्याने एका बाजूने रिकामे येतात. रिकामे वाहन येत असल्याने त्याचा ताण वाहतूक खर्चावर अधिक पडत आहे.

सर्वाधिक स्वस्त अशी कांद्याची मालवाहतूक ही रेल्वेनेच होत आहे. पटना, गुवाहाटी, सिलिगुडी, अमृतसर आणि चंदिगड या भागात जाणारा कांदा हा रेल्वेने रवाना होतांना दिसतो. कांद्याच्या वाहतूक दरात वाढ झाली. त्यात इंधनाच्या वाढीचा मुख्य समावेश असला तरी ट्रकमध्ये भरणारा कांदा आणि व्यापार्‍याकडे ट्रकमधून खाली केलेला कांदा यांच्या मजुरी दरात सुद्धा 50 ते 60 टक्के वाढ झालेली आहे. या सर्व वाढत्या खर्चामुळे कांद्याच्या बाजारभावावर दिवसागणिक मोठा प्रतिकूल परिणाम होतांना दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com