कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करावी: सुवर्णा जगताप

कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरू करावी: सुवर्णा जगताप

लासलगाव । वार्ताहर | Lasalgaon

कांदा (onion) भावातील घसरण थांबवण्यासाठी केंद्राने कांदा निर्यात (onion export) प्रोत्साहन योजना सुरू करावी अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) सभापती सुवर्णा जगताप (Speaker Suvarna Jagtap) यांनी आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार (Health Minister Dr. Bharti Pawar) यांना पत्र पाठवून केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांदा आवकेत वाढ होऊन बाजारभाव कमी होत आहे. तसेच महाराष्ट्रासह (maharashtra), गुजरात (gujrat), राजस्थान (rajasthan), मध्यप्रदेश (madhya pradesh), कर्नाटक (karnataka) व पश्चिम बंगाल (West Bengal) या राज्यांमधील स्थानिक कांदाही तेथील बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने व महाराष्ट्रातील नाशिक (nashik), पुणे (pune), सोलापुर (solapur) या जिल्ह्यात नविन उन्हाळ (रब्बी) कांद्याची (summer onion) आवक सुरू झाल्याने देशांतर्गत कांद्याची मागणी कमी झाल्यामुळे कांदा बाजारभावात घसरण होत असून मिळणार्‍या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकरी (farmers) वर्गाकडून बोलले जात आहे.

कांदा निर्यातदारांकरीता केंद्र शासनाने (central government) यापुर्वी लागु केलेली 10 टक्के कांदा निर्यात (onion export) प्रोत्साहन योजना दि.11 जुन 2019 नंतर बंद केलेली असल्याने सदरची योजना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. भारतीय निर्यातदारांना त्यांनी पाठविलेल्या मालाची रक्कम त्या-त्या देशातील चलनामध्ये अथवा डॉलरमध्ये मिळते. मात्र येथील निर्यातदारांना सदर चलनातील रक्कम पुन्हा भारतीय चलनात परावर्तीत करून घ्यावी लागते. अशावेळी डॉलरचे भाव सतत बदलत असल्याने येथील निर्यातदारांना अनेक वेळा विनिमय दरामुळे तोट्यास सामोरे जावे लागते.

त्यामुळे सार्क देशांमधील आर्थिक व्यवहार त्या-त्या देशातील चलनामध्ये अथवा डॉलरमध्ये न होता भारतीय चलनात होणेसाठी प्रयत्न करण्यात यावा. बांग्लादेशाला रेल्वेद्वारे (railway) कांदा पाठविण्यासाठी असलेली कोटा सिस्टीम संपुष्टात आणुन सदर निर्यातदारांना पाहिजे तेवढा माल पाहिजे तेव्हा बांग्लादेशात पाठविण्यासाठी किसान रेल (Kisan Rail) किंवा बी.सी.एन च्या हाफ रॅकद्वारे पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावा. सध्या रेल्वेद्वारे कांदा पाठविण्यासाठी बी.सी.एन रॅक उपलब्ध करून दिल्या जातात.

सदर रॅकद्वारे कांदा वाहतुकीसाठी साधारणतः 05 ते 08 दिवसांचा कालावधी लागतो. त्याऐवजी येथील कांदा निर्यातदारांना किसान रेल (Kisan Rail) अथवा त्या धर्तीवर व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र रेल उपलब्ध करून दिल्यास सदरचा माल 48 ते 60 तासांमध्ये पोहोचविला जाईल वेळ आणि भाडेदरातील बचतीमुळे व्यापारी वर्ग अधिकचा मोबदला शेतकरी बांधवांना भाववाढीसाठी देवू शकतील. देशांतर्गत किंवा परदेशात कांदा पाठविणार्‍या खरेदीदारांना निर्यातीवर अनुदान दिल्यास माल वाहतूक दरात अनुदान मिळत असल्याने कांदा खरेदीदार जास्तीत जास्त कांदा देशांतर्गत परदेशात पाठविण्यासाठी प्रयत्न करतील.

सध्या येथील शेतकरी बांधवांना लाल कांद्यासाठी 1,000 ते 1100 रु. प्रती क्विंटल उत्पादन खर्च येत असून सद्यस्थितीत येथील शेतकरी लाल कांदा सर्वसाधारण 801 रु. प्रती क्विंटल या दराने विक्री करावी लागत आहे. सद्यस्थितीत लाल कांद्यास मिळत असलेला सर्वसाधारण दर हा उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने शेतकर्‍यांना किमान उत्पादन खर्च मिळावा म्हणुन लाल कांदा विक्रीवर 500 रु. प्रती क्विंटलप्रमाणे अनुदान देणेकामी प्रयत्न करण्यात यावा आदी शेतकरी हिताच्या मागण्या करण्यात आल्या आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com