येवला । सुनील गायकवाड Yevla

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंद करून शेतक-यांच्या पाठित खंजीर खंजीर खुपसला अशी सनसनीत टीका शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे केली.

काल शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत एकत्र आले त्यांनी कांदा भावाची माहिती घेतली.त्यानंतर येवला तहसीलदार कार्यालयात जाऊन वरील प्रमाणे सविस्तर निवेदन देण्यात आले.

येवला तहसील परिसर कोरोणा रूग्ण आढळल्याने प्रतिबंधित करण्यात आला असल्याने मोजक्या कार्यकर्त्यांनी जाऊन नायब तहसीलदार राजेंद्र राऊत यांना सामाजिक अंतर ठेवून निवेदन देण्यात आले.

निवेदनाचा आशय असा कि जून 2020 मध्ये केंद्र सरकार शेतकरी हिताचे तीन अध्यादेश काढते, कांदा जीवनावश्यक वस्तूच्या यादीतुन काढला त्या आध्यादेशाचे शेतकरी संघटनेने आणि शेतक-यांकडून स्वागतही केले होते.

पण अटी शर्यतीचा गैरफायदा घेऊन अचानक कांदा निर्यात बंदी घोषित करते याला काय म्हणायचे ही दुटप्पी भूमिका म्हणजे शेतक-यांच्या पाठित खंजीर खुपसला या शिवाय काय म्हणायचे असा सवाल शेतकरी संघटनेने या निवेदनात म्हटले आहे.

केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी त्वरित कांदा निर्यात चालु करावी अन्यथा महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन करेन असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

शेतकरी संघटना नेते संतु पाटील झांबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले. शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरूण जाधव, बापूसाहेब पगारे, बाळासाहेब गायकवाड, संध्या पगारे, शिवाजी वाघ,जाफरभाई पठाण, विठ्ठल वाळके,अनिस पटेल, योगेश सोमवंशी,आनंदा महालेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.