मजुरांअभावी कांदा लागवड खोळंबली

मजुरांअभावी कांदा लागवड खोळंबली

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

तालुक्यातील शेतकर्‍यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या कांद्याने (onion) लागवडीसाठी मजूर मिळत नसल्याने उत्पादक शेतकर्‍यांना (farmer) हैराण करून सोडले आहे. यावर्षी तालुक्यात पर्जन्यमानाने (Rainfall) प्रथम क्रमांक पटकावला असला तरी कांदा लागवडीसाठी (Onion cultivation) मजूर (Labor) मिळत नसल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील लागवडी खोळंबल्या असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.

तालुक्यात यंदा कांदा लागवडीसाठी लागणार्‍या मजुरांच्या टंचाईने (Labor shortages) शेतकरी हैराण झाले आहेत. अर्थकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याने तालुक्यातील शेतकरी उन्हाळी कांद्याची (Summer onion) मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. सगळीकडे एकाच वेळी कांदा लागवड व पावसाळी कांद्याची काढणी सुरू झाली असल्याने मोठी मजूर टचाई निर्माण झाली आहे.

हजारो हेक्टर कांदा लागवडी मजूरांअभावी खोळंबल्या आहेत. थंडीमुळे (cold) दररोज पडणारे दव आणि धुके (fog) यामुळे दिवसेंदिवस कांदा रोपे खराब होत असून शेतकरी कांदा लागवडीचा आटापिटा करत आहेत. अतिवृष्टीने (heavy Rain) मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची उन्हाळ कांदा बियाणे, लाल कांदा रोपे खराब झाली होती. त्यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांदा बियाणे टाकलेले आहेत व एकाच वेळेस कांदा रोपे आल्याने तालुक्यात कांदा लागवडीने पुन्हा जोर धरला आहे.

तालुक्यात कांदा लागवडीसाठी दहा ते अकरा हजार प्रति एकरासाठी मजुरीचे दर घेतले जात आहेत. एवढे करुनही वेळेवर मजूर उपलब्ध होतीलच याची शाश्वती नाही. आसमानी व सुलतानी सकटांवर मात केलेल्या शेतकरी बांधवांना मजूर मिळत नसल्यामुळे ते हैराण झाले.

वातावरणाचा फटका

कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने व कांद्याची रोपे तयार झाली असून ती रोपे बदललेल्या ढगाळ वातावरणामुळे भुरी होऊन खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मजुरांची वाट पाहण्यापेक्षा आपल्या घरातील व्यक्ती व शेजारील व्यक्ती अशा पद्धतीने जमवाजमव करून कांदा लागवड करण्यात येत आहे.

बियाणे टाकल्यावर ते दीड ते पावणेदोन महिन्यात मुळे लागवडीसाठी योग्य होते. मुळे गाठ तयार होण्यापूर्वी शेतात लागवड करावी लागते. अन्यथा ते वाया जाते. त्यामुळे वेळेत लागवडीसाठी मजुरांची विनवणी करावी लागत आहे. मजूर मिळवण्यासाठी जास्तचे पैसे मोजावे लागत आहे. एकरी कांदा लागवडीसाठी 8 ते 10 हजार रुपये मजुरी द्यावी लागत असून मजूर ने -आण करण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत आहे.

सुनिल शिंदे, शेतकरी वडाळी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com