बदलत्या हवामानाने कांदा पिक धोक्यात

धुक्यामुळे पात सुकल्याने वाढ खुंटली
बदलत्या हवामानाने कांदा पिक धोक्यात

सिन्नर । अमोल निरगुडे | Sinnar

मागील काही दिवसांपासून तालुक्यात सततच्या हवामान बदलाने (Climate change) कांदा पिक (onion crop) संकटात सापडले असून सध्या पडलेल्या कडाक्याच्या थंडीने (cold) व धुक्यामुळे (fog) कांद्याची पात सुकू लागली आहे. याचा परिणाम कांद्याच्या वाढीवर होत असल्याचे बघायला मिळत आहे.

सातत्याने निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाचा (Cloudy weather) कांदा पिकाला जोरदार फटका बसला आहे. कांदा बीजोत्पादन (Onion seed) तसेच नियमित कांदा पीक घेणारे शेतकरी (farmer) यामुळे अडचणीत सापडले आहेत. कृषी विभाग (Department of Agriculture), कृषी विद्यापीठामार्फत (University of Agriculture) यासाठी तातडीने मार्गदर्शनाची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात सिन्नर तालुका (sinnar taluka) कांदा बीजोत्पादन तसेच कांदा उत्पादनासाठी अग्रेसर समजला जातो.

मागील काही वर्षांत तालुक्यातील लागवड स्थिरावलेली आहे. यंदाच्या हंगामात शेतकर्‍यांनी दिवाळी होताच कांदा लागवडीचे काम हातात घेतले होते. नोव्हेंबर महिन्यात अचानक आठवडाभरापेक्षा अधिक काळ ढगाळ वातावरण राहिल्याने सर्वच पिकांवर बुरशीचे प्रमाण वाढले. ढगाळ वातावरणानंतर धुके पडल्याने शेतकर्‍यांनी लागवड केलेल्या पिकाचे नुकसान झाले. ढगाळ वातावरण, धुक्यामुळे कांदा रोपांवर व कांदा बीज उत्पादनावर परिणाम झाला. मर रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिकाचे नुकसान होऊ लागले आहे.

यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या संकटात तातडीने उपाययोजनांची गरज आहे. मात्र, शेतकर्‍यांना कृषी विभागाकडून कोणतेही मार्गदर्शन होताना दिसत नाही. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत अधिकारी पोहचलेले नाहीत. परिणामी कांद्याच्या पातीवर रोगाचा व धुक्याचा परिणाम झाल्याने कांदा पात पिवळी पडण्यासह सडण्याचे प्रमाण वाढत आहे.

कांद्याची वाढ होत नसल्याने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या पिकांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. अनेक शेतकर्‍यांनी लाल व उन्हाळी कांद्याचे महागडी बियाणे आणून शेतात टाकली होती. मात्र, ढगाडळ वातावणामुळे (Cloudy weather) कांद्यांच्या रोपे व लावलेल्या कांद्याची पात पिवळी पडून करपू लागली आहे. शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधांची फवारणी (Spraying of fungal drugs) करत असले तरी त्याचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मोठ्या भांडवली खर्चातून लागवड केलेला हा कांदा परतीच्या पावसाच्या संकटातून वाचवण्यात शेतकर्‍यांना काही प्रमाणात यश आले होते. मात्र, आता वातावरणातील बदलामुळे करपा रोगाच्या संकटात हा कांदा सापडला आहे. सकाळी पडणारें धुकें, दव यामुळे कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असून शेतकर्‍यांची चिंता त्यातून वाढली आहे.

कांदा जगवण्याची धडपड कांद्यावरील करपा व माव्यामुळे रासायंनिक औषधांची फवारणी करण्यासाठी एकरी दोन ते तीन हजार खर्च येतोय. सुरुवातीला अवकाळी पावसाने कांद्याची रोपे गेली. त्यांनतर तीस हजार रुपयांपर्यत कांद्याचे रोप घेऊन कांदा लागवड केली. जेवढा खर्च संपूर्ण काढणीला येतो, तेवढाच खर्च आजपर्यंत होऊन बसला आहे. त्यात धुक्याचा प्रादुर्भाव वाढल्याने औषधांचा परिणाम जाणवत नाही. कांदा पात पिवळी पडत असून कांद्याची वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. माझ्यासारखीच इतर अनेक शेतकर्‍यांची अवस्था झाली असून कृषी विभागाकडून कुठलेही मार्गदर्शन मिळालेले नाही.

बाळासाहेब गायकवाड, जायगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com