
लखमापूर । वार्ताहर | Lakhmapur
दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) रब्बी हंगामाची (rabbi season) अनेक अस्मानी संकटाचा सामना करत बळीराजांने सांगता केली असुन आता खरीप हंगामांची लगीनघाई सुरू झाली आहे. मागील रब्बी हंगाम शेतकरी (farmres) वर्गाला तारे वरची कसरत करणारा ठरला असुन अनेक पिकांनी भावाच्या बाबतीत बळीराजांची साथ सोडली आहे.
त्यात द्राक्षे (Grapes), भाजीपाला (Vegetables), बेदाणा , इ.नगदी भांडवल देणा-या पिकांनी बळीराजांची भावांच्या बाबतीत घोर निराशा केली आहे. रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा (summer onion) हा शेतकरी वर्गाने बललते वातावरण, अस्मानी संकटे, अवकाळी पाऊस (Untimely rain), गारपीट (Hail), इ.च्या मोठमोठ्या संकटातून मोठ्या मेहनतीने वाचवला आहे.
त्यात बहुतेक शेतकरी (farmers) वर्गाचा कांदा हा या विविध संकटातून खराब झाला आहे. त्यामुळे सध्या उन्हाळी कांद्याची एकरी सरासरी टक्केवारीवर यांचा विपरीत परिणाम झाला आहे. ज्या ठिकाणी एक एकर मध्ये अंदाजे पाच टँक्टर निघायला पाहिजे तेथे सध्याच्या मिती दोन ते तीन टँक्टर कांदा निघत आहे.
त्यामुळे शेतकरी वर्गातुन नाराजीचे सुर निघत आहे. रब्बी हंगामातील (rabbi season) अनेक पिकांनी शेतकरी वर्गाची निराशा केल्यामुळे आता बळीराजांच्या सर्व आशा उन्हाळ कांद्यावर एकवटल्या आहे. मोठ्या मेहनतीने वाचवलेला उन्हाळ कांद्याला योग्य भाव मिळाला तर रब्बी हंगामातील नुकसान भरून निघेल. व खरीप हंगामातील पिके घेण्यास मोठा आधार मिळेल या अपेक्षेवर सध्या दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्ग दिसत आहे. खरीप हंगामातील बियाणे, खते , शेतीमशागती साठी लागणारा खर्च, नांगरणी, पेरणी,मजुरी इ.वाढत्या महागाई चा मोठा परिणाम होतांना ही दिसत आहे.
परंतु उन्हाळ कांदा भांडवल म्हणून आपल्या जवळ असल्याने शेतकरी वर्ग कांद्याच्या भावाचे अंदाज घेऊन. त्याप्रमाणे शेतकरी वर्ग प्रयत्नशील होतांना दिसत आहे. सध्या मितीला कांदा मार्केट मध्ये दिवसेंदिवस ब-यापैकी उन्हाळ कांद्याची आवक होऊ लागल्याने भर उन्हात शेतकरी कांदा मार्केट पर्यंत नेत आहे.व योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा वाढली आहे.
कांदा साठविण्यांवर भर
तालुक्यातील काही शेतकरी वर्गाने सध्याच्या मार्केट मधील कांद्याच्या भावाबाबतीत चढ उतार निर्माण झाल्याने कांदा चाळीमध्ये साठवण करण्यावर भर दिला आहे. व आज ना उद्या कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेवर आता बळीराजांने लक्ष केंद्रित केले आहे.